- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या एका लहान मुलाची त्याच्या आई-वडिलांशी अवघ्या पाच तासांत सुखरूप भेट घडवून आणण्यात यश मिळाले. ही हृदयस्पर्शी घटना १२ जून २०२६ रोजी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. बिजलीनगर येथील पुलावर एक लहान मुलगा रडत असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी मुलाची ओळख पटविण्यासाठी परिसरात चौकशी केली, मात्र कोणालाही त्याच्याबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे संबंधित नागरिकांनी मुलाला चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलगा ताब्यात मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील अश्विनी राक्षे, राणी सिंग आणि ऋतिका लांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मुलगा मुस्लिम समाजातील…
पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील सिटी प्लाझा लॉज परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधातील कारवाईदरम्यान आणखी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौक मार्गावरील सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर संबंधित महिला येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना शब्द उच्चारून, डोळ्यांनी खुणावत तसेच लैंगिक हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होऊन शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला आरोपी फरार असून तिचा…
पिंपरी-चिंचवड : चिंचवड परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर पोलिसांनी कारवाई करत ५१६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी गावठाण परिसरात इलेक्ट्रिक डीपीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून २७ हजार रुपये किमतीचा ५१६ ग्रॅम गांजा आढळून आला. चौकशीदरम्यान एका बालकाने हा गांजा दुसऱ्या बालकाकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिंचवड परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीच्या साखळीचा…
पिंपरी-चिंचवड : “तुम्हाला ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळणार असून तपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज तिवारी (रा. नवी दिल्ली) याने स्वतःला \”बीमा लोकपाल, दिल्ली\” कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींशी संपर्क साधला. ६० कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे आमिष दाखवत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.त्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील,” असे आमिष दाखवून तळवडे येथील एका नागरिकाची तब्बल ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०४/२०२६…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध हातभट्टी दारू विक्रीसाठी उभारण्यात आलेली सहा ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दारू विक्रीची ठिकाणे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी विभागाशी समन्वय साधून ती निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी -चिंचवड : पर्यावरण दिनानिमित्त वाल्हेकरवाडी परिसरात नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी हॉस्पिटलजवळील स्पाईन रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.…
फुगेवाडी : फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वतीने एक महिन्याच्या शिधा किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिधा वाटप कार्यक्रमात श्री. गुल्लू शेठ आसवानी, माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, मंगेश घाडगे, महेंद्र बाविस्कर, भाजपा मंडलाध्यक्षा अनिता वाळुंजकर , श्री यशवंत भोसले , डॉक्टर वाबळे , यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या विषारी दारू दुर्घटनेचा मुख्य आरोपी मंगलसिंग वीरका असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या घरातून…
मोहोळ प्रतिनिधी | ज्योतीराम कांबळे मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनुसूचित जातीतील विवाहित महिलेवरील गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाने थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 420/2026 अंतर्गत दाखल या प्रकरणात बीएनएस तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंद असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडित कुटुंब भयभीत असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,…
प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी ही धडक कारवाई केली. शेगाव दुमला येथे एका टेम्पो गाडी, ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री असा 11 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा, ज्याची किंमत 7 लाख 50 हजार रुपये, जप्त करण्यात आला. याशिवाय आंबेगाव येथे एका टिप्परमध्ये 5 ब्रास वाळूसह 28 लाख 30 हजार…
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे आरोपीचा घृणास्पद डाव फसला असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारच्या सुमारास सोसायटीमध्ये शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन अल्पवयीन मुलींना बोलावले. “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,” असे सांगून त्याने मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. तेथे आरोपीने मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांच्यावर बळजबरी…