Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर, चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्राचार्य मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विविध संतांच्या आकर्षक वेशभूषांमधून विद्यार्थ्यांनी संतपरंपरेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी सजविलेली पालखी, टाळ, मृदंग, भगवे पताके आणि वारकरी दिंडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते पारंपरिक पद्धतीने साकारण्यात आलेले भव्य रिंगण. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरावटीत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी उत्साहाने पालखी नाचवत वारकरी परंपरेचा जिवंत अनुभव साकारला. या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या अनोख्या सोहळ्याचा मनापासून आनंद लुटला.

या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ. लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मतेचे संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा पालखी सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.

या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पालखी सोहळा आनंददायी, संस्कारमय आणि अविस्मरणीय ठरत उपस्थितांच्या मनात भक्तीभावाची अविस्मरणीय छाप उमटवून गेला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
Next Article चिखली पोलिसांची मोठी कारवाई; वाहनचोरीचे पाच गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?