Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
शैक्षणिक

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोहोळ प्रतिनिधी | ज्योतीराम कांबळे

मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनुसूचित जातीतील विवाहित महिलेवरील गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाने थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 420/2026 अंतर्गत दाखल या प्रकरणात बीएनएस तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंद असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडित कुटुंब भयभीत असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित समाजातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांकडून कठोर आणि तातडीची कारवाई अपेक्षित आहे. मात्र या प्रकरणात आरोपींना अभय मिळत असल्याचा संशय निर्माण होत आहे. आरोपींकडून पुरावे नष्ट करणे, साक्षीदारांवर दबाव टाकणे तसेच पीडित कुटुंबाला धमकावण्याची शक्यता देखील संघटनेने व्यक्त केली आहे.

या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण, निष्पक्ष चौकशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास आणि दोषींवर कठोर कारवाई अशा सात ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊनही तपासाची गती मंद असल्याची चर्चा सुरू झाली असून मोहोळ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पीडितेला न्याय द्या, आरोपींना तात्काळ बेड्या ठोका,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने घेतली असून, लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे, शावरप्पा वाघमारे, परमेश्वर काळे, बाळासाहेब आळसंदे, शोभा धुळराव, कविता कोडवान, प्रविण लांबतूरे, गोपाळ सौदागर, आशा शेरखाने, इंदू कांबळे, सुर्यकांत व्हनकडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.
Next Article माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

एक हात गळ्यात, तरीही कर्तव्य बजावत वाहतूक पोलिसाची वाहतूक कोंडीवर मात.

August 9, 2026

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?