Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी :  प्रशांत पटाडे ||

म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध हातभट्टी दारू विक्रीसाठी उभारण्यात आलेली सहा ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दारू विक्रीची ठिकाणे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी विभागाशी समन्वय साधून ती निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दिनांक ११ जून २०२६ रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी विभाग यांच्या संयुक्त पथकाने महाळुंगे, निघोजे, कुरुळी आणि तळवडे परिसरातील सहा अवैध हातभट्टी दारू विक्री केंद्रांवर कारवाई करून ती जेसीबीच्या सहाय्याने कायमची नष्ट केली.

 

या कारवाईत दुरेश रमेश राठोड, लखन जडजा शिंदे, पुष्पादेवी शांतीलाल जाट, लखन हाजुरीया ठाकूर, उदय अशोक कलाल आणि सुश्मिता बंडू हितेज यांच्याशी संबंधित अवैध दारू विक्रीची ठिकाणे नेस्तनाबूत करण्यात आली.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे व त्यांचे पथक तसेच एमआयडीसी विभागाचे अधिकारी कर्डीले व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

अवैध दारू व्यवसायाविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.
Next Article ६० कोटींच्या विमा पॉलिसीचे आमिष; तळवडेतील नागरिकाची ३० लाखांची ऑनलाइन फसवणूक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?