Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
गुन्हेगारी

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या अत्यंत संवेदनशील आणि राज्यभर संतापाची लाट उसळविणाऱ्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (दि. २५ जून) जाहीर होणार आहे. अवघ्या पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत तपास, आरोपपत्र दाखल करणे आणि न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्याने हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक मानला जात आहे.

या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र दिनी घडली होती संतापजनक घटना

महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे २०२६ रोजी, नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

घटनेनंतर आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली.

नागरिकांचा उद्रेक; महामार्गावर रास्ता रोको

या अमानुष घटनेच्या निषेधार्थ नसरापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आरोपीला तातडीने कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (बायपास मार्गावर) तब्बल चार तासांहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे राज्यभरात या प्रकरणाची तीव्र दखल घेतली गेली.

वेगवान न्यायप्रक्रियेचे उदाहरण

घटना घडल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत तपास पूर्ण होणे, आरोपपत्र दाखल होणे आणि न्यायालयीन सुनावणीदेखील पूर्ण होणे ही बाब विशेष मानली जात आहे. पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, यासाठी पोलिस, सरकारी वकील आणि न्यायालयाने प्राधान्याने कार्यवाही केल्याचे मानले जात आहे.

राज्याचे लक्ष निकालाकडे

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर होणार असून, न्यायालय आरोपीला दोषी ठरवते की नाही आणि दोषी ठरवल्यास कोणती शिक्षा सुनावते, याकडे सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना आणि कायदेतज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
Next Article स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

लोहगड किल्ल्यावरून 250 फूट दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू टीमची तत्पर मदत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?