Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी -चिंचवड  : पर्यावरण दिनानिमित्त वाल्हेकरवाडी परिसरात नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी हॉस्पिटलजवळील स्पाईन रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आपल्या मनोगतात नगरसेविका तथा शिक्षण मंडळ सदस्या सौ. पल्लवीताई सुधीर वाल्हेकर म्हणाल्या, “वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. आज आपण ज्या वेगाने पर्यावरणीय संकटांना सामोरे जात आहोत, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास आपल्या शहराचा हरित विकास निश्चितपणे साध्य होऊ शकतो. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या पिढीसाठी निरोगी जीवनाचा आधार ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. हरित पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.”

यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले माजी नगरसेवक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. नामदेवजी ढाके यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शहराचा वाढता विस्तार आणि कमी होत चाललेली हरितक्षेत्रे ही चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही. नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी होऊ शकते. आजचा उपक्रम हा केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”

या उपक्रमास माजी नगरसेवक मा. राजेंद्र साळुंखे, विद्यमान नगरसेविका मा. आशाताई सूर्यवंशी, माजी शिक्षण सभापती मा. श्रीधरभाऊ वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते मा. विलास वाल्हेकर, युवा मंडलाध्यक्ष मा. यश वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिन वाल्हेकर, सौ. रूपालीताई वाल्हेकर, सौ. कीर्ती परदेशी यांच्यासह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमाजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Next Article दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?