Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » चिंचवड पोलीस स्टेशनचे दामिनी पथक ठरले देवदूत; हरवलेल्या चिमुकल्याची आई-वडिलांशी अवघ्या पाच तासांत भेट.
पिंपरी चिंचवड

चिंचवड पोलीस स्टेशनचे दामिनी पथक ठरले देवदूत; हरवलेल्या चिमुकल्याची आई-वडिलांशी अवघ्या पाच तासांत भेट.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या एका लहान मुलाची त्याच्या आई-वडिलांशी अवघ्या पाच तासांत सुखरूप भेट घडवून आणण्यात यश मिळाले. ही हृदयस्पर्शी घटना १२ जून २०२६ रोजी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

बिजलीनगर येथील पुलावर एक लहान मुलगा रडत असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी मुलाची ओळख पटविण्यासाठी परिसरात चौकशी केली, मात्र कोणालाही त्याच्याबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे संबंधित नागरिकांनी मुलाला चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलगा ताब्यात मिळताच  पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील अश्विनी राक्षे, राणी सिंग आणि ऋतिका लांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मुलगा मुस्लिम समाजातील असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील मशिदींमध्ये जाऊन माहिती दिली. तसेच विविध माध्यमांतून आणि स्थानिक स्तरावर चौकशी करून मुलाच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

दामिनी पथकाच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आणि अवघ्या पाच तासांच्या आत मुलाच्या पालकांचा शोध लागला. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या हरवलेल्या मुलाला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

चिंचवड पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, नागरिकांकडून दामिनी पथकाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. समाजातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी पोलिस नेहमीच मदतीला तत्पर असतात, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसिटी प्लाझा लॉज परिसरात पुन्हा कारवाई; अनैतिक व्यवसायाच्या संशयावरून महिलेविरुद्ध गुन्हा.
Next Article शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाची आकर्षक पुष्पसजावट.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?