Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी मानद सचिव तसेच पिंपरी-चिंचवडचे पहिले स्काऊट कमिशनर स्व. श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या स्काऊट पथकाने स्व. मुथा यांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवकार महामंत्र व ‘ॐ नमः शिवाय’ जप करण्यात आला. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया, कार्यकारिणी सदस्य प्रकाशचंद बंब व जयकुमार धोका यांच्या हस्ते विविध स्पर्धा दालनांचे उद्घाटन करण्यात आले.

प्राचार्य विक्रम काळे यांनी स्व. मुथा यांच्या शैक्षणिक कार्याचा, दूरदृष्टीचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला. उपमुख्याध्यापक हितेंद्र लोखंडे यांनी त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी ‘निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर डॉ. सचिन लवणे (व्यवस्थापक, कै. प्रभाकर कुटे रुग्णालय, आकुर्डी) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. तसेच पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व आयसर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘कल्पना’ उपक्रमांतर्गत प्रा. घनश्याम साके यांनी विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन व नेत्र तपासणी शिबिर, ऑरगंडी फुले व कागदी पिशव्या तयार करण्याची कार्यशाळा, चित्रकला, हस्ताक्षर व काव्यलेखन स्पर्धा तसेच पालकांसाठी पारंपरिक थाळी पाककला व पूजा थाळी सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. समाजऋणाची जाणीव ठेवत तालेरा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. स्व. मुथा यांच्या कार्यावर आधारित माहितीपर पीपीटीही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक संजीव वाखारे, पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी व शिक्षक प्रतिनिधी व्ही. एस. पाटील यांनी केले. राजेंद्र पितळीया यांनी आभार मानले, तर धनश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. स्व. शंकरलालजी मुथा यांच्या आदर्श विचारांचा व समाजसेवेचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
Next Article श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?