Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
सामाजिक

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 6, 2026Updated:June 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

फुगेवाडी  : फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वतीने एक महिन्याच्या शिधा किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिधा वाटप कार्यक्रमात श्री. गुल्लू शेठ आसवानी, माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, मंगेश घाडगे, महेंद्र बाविस्कर, भाजपा मंडलाध्यक्षा अनिता वाळुंजकर , श्री यशवंत भोसले , डॉक्टर वाबळे , यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या विषारी दारू दुर्घटनेचा मुख्य आरोपी मंगलसिंग वीरका असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या घरातून झालेल्या दारू वितरणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्याच्या अनधिकृत बांधकामास नोटीस बजावलेली असून, सदर ठिकाणी भेट देत अमर साबळे यांनी १७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या अनधिकृत घरावर तात्काळ बुलडोजर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.

“निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी व्यक्तीवर कायमस्वरूपी दहशत निर्माण व्हावी, यासाठी त्याच्या अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन अमर साबळे यांनी केले.

दरम्यान, विषारी दारू प्राशनामुळे अत्यवस्थ झालेल्या व वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही अमर साबळे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली व रुग्णांना आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, गोपीशेठ आसवानी, नंदकुमार वाखारे, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर, महेंद्र बाविस्कार, दिपक नागरगोजे, विशाल सातपुते, सुभाष सिंघल, सुर्यकांत वाखारे, रामदास भांडे, राजेश निहूल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पीडित कुटुंबीयांना मदत व आवश्यक समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लवकरच विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नागरिकांच्या भावना

फुगेवाडीतील या दुर्दैवी दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले आहेत. घरातील कर्ती व्यक्ती गमावल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची व आर्थिक संकटाची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी अमर साबळे यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मदतीचा हात दिल्याने कुटुंबीयांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “आमचे माणूस गेले, ती पोकळी कधीच भरून निघणार नाही; मात्र या दुःखाच्या काळात आमच्या दारी येऊन आधार दिल्याने आम्हाला मानसिक बळ मिळाले,” अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.
Next Article नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?