- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक व शाहीर अमरजी पुणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगायन, भाषण व नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तसेच पालकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत आपले विचार मांडले. अमरजी पुणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांग व्यक्ती हा समाजरचनेतील विविधतेने संपन्न असलेला विशेष घटक आहे. दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या…
चिखली : आज, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, चिखली येथे आंतरशालेय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मातृ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळविला. या यशामागे विद्यालयाच्या शिक्षिका सौ. स्वाती दिलपाक आणि सौ. स्मिता चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी सादरीकरणातून परीक्षकांची दाद मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे मातृ विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याच्या सर्व्हलन्स पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला स्वारगेट परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. आदित्य अशोक चव्हाण (रा. लोंढे चाळ, तलेरा हॉस्पिटलजवळ, चिंचवड, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दि. १० ऑगस्ट रोजी चिंचवड पोलीस ठाण्याचे सर्व्हलन्स पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार लोहकरे व फरांदे यांना खास बातमीदारामार्फत आदित्य चव्हाण हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आदित्य चव्हाण याच्याविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा र. क्र. ६३/२०२६ नुसार…
चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिसांच्या सर्व्हलन्स पथकाने खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला सांगवी परिसरातून ताब्यात घेतले. सचिन उर्फ सोल्जर जटाप्पा हेलवर (वय २७, रा. महबूब सुभानी दर्ग्यासमोर, मरिआई मंदिराजवळ, मोरया नगर, वेताळनगर, चिंचवड, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३०८(५), १८९, १८९(२), १९०, ३५२, ३५१(२) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३(७) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. आरोपीचा…
छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर सहभागी झाले होते. तसेच संघाचे पदाधिकारी, कष्टकरी गटई बांधव, महिला पदाधिकारी आणि चर्मकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनुसूचित जातींच्या ५९ जातींची एकजूट अबाधित राहावी, यासाठी उपवर्गीकरणाला विरोध करण्यात येत असून महाराष्ट्रातील विविध तालुका व जिल्हास्तरांवर आंदोलन आणि मोर्चे सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारने उपवर्गीकरणाचे धोरण रद्द करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणी…
मुंबई : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत दाखल होणारे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधी व न्याय विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. अहिल्यानगर (अहमदनगर), परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे प्रत्येकी एक अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, सहाय्यक कर्मचारी तसेच इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) चे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्यस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला…
पुणे : सायंकाळची वेळ… पुणे तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी… त्यात कामगार वर्गाच्या बस रस्त्याच्या कडेला थांबत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावलेला. त्यातच इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईने दुचाकीस्वारांकडूनही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र. अशा परिस्थितीत लिंब फाटा येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याने दाखवलेले कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण कौतुकास्पद ठरले. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लिंब फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी गर्दीतून वाट काढत पुढे जात वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा एक हात गळ्यात बांधलेला…
उरावडे : मुळशी तालुक्यातील उरावडे येथील संकल्प व्हॅली स्कूललगत सुरू असलेल्या Muller-BBM Acoustic Technology Pvt. Ltd. (Mसागर मारणे यांनी यापूर्वी PMRDA आयुक्त तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून शाळेतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात संकल्प व्हॅली स्कूल आणि MBBM कंपनीमध्ये अवघे २० ते २२ मीटर अंतर असल्याचा दावा करण्यात आला आहे.BBM) कंपनीच्या कामकाजामुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष सागर सोपानराव मारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला आहे. PMRDA प्रशासनाने सागर मारणे…
प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला गावातील तरुण युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरामध्ये एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान आहे’ या संदेशातून मंडळाच्या वतीने नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक विचारांना अभिवादन करत युवकांनी समाजोपयोगी उपक्रमातून जयंती साजरी केली. अंबिका बहुउद्देशीय संस्था, पंढरपूर ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र…
हिंजवडी : प्रेमप्रकरणाच्या कारणातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना हिंजवडी परिसरात गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली. या घटनेनंतर कारमधून पंढरपूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून ताब्यात घेतले. दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी-भुमकर चौक, हिंजवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश झांबरे याचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा राग दिनेशच्या मनात होता. याच रागातून गुरुवारी दिनेश संबंधित तरुण आणि तरुणी राहत…