Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड  : पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे आरोपीचा घृणास्पद डाव फसला असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारच्या सुमारास सोसायटीमध्ये शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन अल्पवयीन मुलींना बोलावले. “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,” असे सांगून त्याने मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले.

तेथे आरोपीने मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, “हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन,” अशी धमकी देत मुलींना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. आरोपीच्या धमकीमुळे मुली हादरल्या होत्या. मात्र, त्यातील एका १० वर्षीय मुलीने घरी पोहोचताच संपूर्ण प्रकार आईला सांगितला. चिमुरडीच्या धाडसामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपी दिनेश चौधरी याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, संबंधित सोसायटीमध्ये कामाचा त्याचा तो पहिलाच दिवस असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापूर्वी तो एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये कार्यरत होता.

सोसायटीच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.
Next Article पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?