- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी-चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन रामदास जमदाडे यांच्या निवासस्थानी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती समजताच नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी लगेचच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी- चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन जमदाडे यांचे वडील रामदास जमदाडे यांच्या घरी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती समजताच नगरसेविका पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देत जमदाडे कुटुंबीयांची विचारपूस केली. “ काळजी करू नका,…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये शुभम वाल्हेकर यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळताना दिसत आहे. मित्रपरिवार, स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने प्रभागात त्यांच्या प्रचाराचे वातावरण सकारात्मक बनले आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बिजलीनगर, गिरिराज, प्रेमलोक पार्क व दळवीनगर या परिसरांमध्ये शुभम वाल्हेकर यांचा जनसंपर्क वाढताना दिसत आहे. घराघरांतून संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेण्यावर भर देण्यात येत असून, तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचाही प्रचाराला सक्रीय सहभाग आहे. मित्रपरिवाराच्या माध्यमातून राबवण्यात येणारे प्रचार सत्र, बैठका आणि प्रत्यक्ष भेटीमुळे प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १७ मधील निवडणूक यंदा केवळ राजकीय लढत न राहता, उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर केंद्रित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शुभम दिलीप वाल्हेकर हे या प्रभागातून निवडणूक लढवत असून, यापूर्वी अनेक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यरत असतानाही ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या उमेदवाराला डावलून आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुभम वाल्हेकर यांच्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे.…
‘बाहेरचा उमेदवार नको’ वाल्हेकरवाडीतील महिलांची ठाम भूमिका; अजित पवार व नाना काटे यांच्याशी थेट चर्चा
चिंचवड : पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी येथे स्थानिक उमेदवारीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयश्री सुनील सोनवणे आणि पक्षाचे पदाधिकारी सुनील किसन सोनवणे यांनाच उमेदवारी द्यावी, तसेच बाहेरचा उमेदवार देऊ नये, अशी ठाम व एकवटलेली मागणी प्रभागातील महिलांनी केली आहे. या मागणीसंदर्भात वाल्हेकरवाडीतील महिलांनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Nana Kate यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षितता तसेच मूलभूत नागरी सुविधांचे गंभीर प्रश्न मांडण्यात आले. रोजच्या अडचणी अनुभवणाऱ्या आणि कायम नागरिकांच्या संपर्कात असलेल्या स्थानिक नेतृत्वालाच…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने निर्णायक आघाडी घेतली असून, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विविध पक्षांतील मातब्बर, अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्यांचा जम्बो प्रवेश झाला आहे. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून विरोधी पक्षांच्या गटात खळबळ उडाली आहे. भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विकासावर विश्वास ठेवत शहराच्या प्रगतीत सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतर नसून शहर विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे…
पिंपरी-चिंचवड : प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा विद्यामंदिर, गणेश नगर, थेरगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. (नितीन भाऊ गवळी) यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर (क्रिटिकल) आजार आढळल्यास त्याच्या पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी किंवा त्यांच्या कार्यकारिणीमार्फत करण्यात येईल, अशी ठाम वचनबद्धता यावेळी जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, शहरातील नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि संवेदनशीलता दर्शवणारा उपक्रम ठरला. “वाढदिवस हा दिखाव्यासाठी नाही, तर समाजासाठी” हा संदेश या…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी-चिंचवड : अवैध शस्त्रधारकांवर धडक कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 01 ने काळेवाडी परिसरात एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवून देशी बनावटीचे कट्टा व जिवंत राऊंड बाळगणाऱ्या युवकाला रंगेहाथ पकडले आहे. महापालिका व पोलिस आयुक्तालय हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या शस्त्रप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत मोलाची ठरत आहे. घटनेनुसार, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलीस हवालदार सागर अवसरे व पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, रोहित महादेव आगरखेड (वय 22, रा. पवनानगर, काळेवाडी) हा इसम अवैधरित्या शस्त्र बाळगून परिसरात फिरत…
बाटीॅ पुणे समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग तसेच विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान संविधान जागर सप्ताह उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत समतादूतांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार–प्रसार करण्यात आला. प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क–कर्तव्ये आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या याबाबत माहिती देत संविधान कायम टिकून राहावे यासाठी नागरिकांची बांधिलकी महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. सप्ताहात व्याख्यान, प्रबोधनपर कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘हर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत…
|| प्रतिनिधी : विशाल शेळके || पिंपरी : ७ डिसेंबर २०२५ सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पिंपरीच्या सभासदांचा प्रथम मेळावा संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.७) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने बँकेची सभासद उपस्थित होते. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्यावतीने सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची निवड करण्यात आली.यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले,माजी संचालक अशोक दखनेजा, माजी संचालक व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज, नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली. यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सेवा विकास बँकेतील बहुमतातील कर्मचारी…