Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

प्रथम सभासदांच्या मेळाव्यात सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comDecember 7, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : विशाल शेळके ||

पिंपरी :  ७ डिसेंबर २०२५ सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पिंपरीच्या सभासदांचा प्रथम मेळावा संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.७) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने बँकेची सभासद उपस्थित होते. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्यावतीने सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची निवड करण्यात आली.यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले,माजी संचालक अशोक दखनेजा, माजी संचालक व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज, नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली.

यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सेवा विकास बँकेतील बहुमतातील कर्मचारी सप्टेंबर २०२५ ला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद झाले. त्यांच्याकडून बँकेच्या लिक्विडेटर कडून झालेल्या अन्यायाची माहिती मिळाली. त्यावरून अप्पर कामगार आयुक्त कार्यालय यांना संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला व बँकेचे विभाग बंद करताना व कामगारांना कामावरून काढताना महाराष्ट्र शासनाची व कामगार विभागाची परवानगी घेतली होती का? याबाबतची लेखी विचारणा संघटनेच्या वतीने आम्ही केली. त्यावेळेस अशाप्रकारे अर्जही केलेला नाही ही माहिती पुढे आली व बँकेच्या चौकशीचे पत्र माननीय अपर कामगार आयुक्त पुणे यांना आम्ही त्यावेळेस दिले. त्यावरून असे निदर्शनास आले की लिक्विडेडर यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने शासनाची परवानगी न घेता २०५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले व बँकेचे काही विभाग देखील बंद केलेले आहेत. आमच्या तक्रारीवरून माननीय कामगार आयुक्त मुंबई यांनी शासकीय कामगार अधिकारी यांना बँकेच्या चौकशीसाठी पाठवले. त्याचप्रमाणे शासकीय कामगार अधिकारी यांनी बँकेची याबाबत चौकशी देखील केलेली आहे. शासकीय कामगार अधिकारी येणार हे कळताच २०५ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रखडलेल्या वेतनाची आठ ते दहा टक्के रक्कम जवळपास दोन ते तीन लाख जमा करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

आज रविवार रोजी बँकेचे सभासद,ठेवीदार,ग्राहक व सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभाग घेतला व सर्वांनी ही बँक पुन्हा सुरू करावी अशी एक मुखाने मागणी केली. सेवा बँक बचाव कृती समिती स्थापन करावी असे सूचना सभासदांच्या वतीने आली त्यानुसार या मेळाव्यामध्ये सेवा विकास सहकारी बँक मर्यादित बचाव कृती समितीची स्थापना करत असल्याची घोषणा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी करताच बँकेचे माजी संचालक अशोकराव दखनेजा यांनी तो ठराव मेळाव्यामध्ये मांडला व त्यास व्ही. टी जोगदंड यांनी अनुमोदन दिल्याचे जाहीर केले. या मेळाव्यात या कृती समितीच्या अध्यक्षस्थानी एस बी ओहाळ यांची निवड केल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.

उपस्थित सर्व सभासदांनी कृती समितीच्या स्थापनेला आणि अध्यक्ष निवडीला एक मुखाने हात वर करून मंजुरी दिली. सेवा विकास बचाव कृती समितीच्या वतीने दि सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा परवाना रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी रद्द केला तो पुनः प्राप्त करण्यात यावा आणि या बँकेस परवाना पुन्हा बहाल करून तिचे कार्य पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. लिक्विडेटर यांची सध्याची नियुक्ती रद्द करून त्यांना पदमुक्त करण्यात यावे आणि बँकेचे संपूर्ण नियंत्रण हे पुन्हा बँकेच्या संबंधित सभासदांच्या ताब्यात देण्यात यावे व त्यांना व्यवस्थापक संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार बहाल करण्यात यावेत असा ठराव माननीय आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन तसेच बँकेचा लिक्विडेटर यांना देण्याचे यावेळी ठरले.तसेच २०५ कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घेऊन थकीत त्यांचे मागील तीन वर्षाचे वेतन द्यावे असा ठराव करून या दोन्ही ठराव माननीय आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन पुणे यांना तसेच लिक्विडेटर सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना द्यावा असा ठराव देखील एकमुखाने मंजूर करण्यात आला. याच मेळाव्यामध्ये सेवा विकास को-ऑपरेटिव बँक स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून व्यापाऱ्यांनी ही उभी केलेली सहकारी बँक हा प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे इतर कोणत्याही सहकारी वित्तीय संस्थेला अथवा बँकेला विलीन अथवा हस्तांतरित करू नये असा ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला. हा ठराव देखील मा आयुक्त सहकार महाराष्ट्र शासन व लिक्वीटर यांना सेवा विकास बँक बचाव कृती समितीच्या वतीने तथा बँकेच्या सभासदांच्या स्वाक्षरीने ठरले हे आज सर्व ठराव पाठवण्याचे ठरले.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सभासद,व्यापारी व ग्राहक, ठेवीदार, कृती समितीच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारी उपस्थित सभासदांनी घेतली.

सूत्रसंचालन व आभार सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबईत मोठी दुर्घटना, लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या प्रतीशचा हात सटकला अन् अनर्थ, वाचवायला गेलेला मित्रही जखमी.
Next Article बाटीॅतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा – नागरिकांमध्ये अधिकार व कर्तव्यांची जागृती.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?