पिंपरी-चिंचवड : प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
प्रज्ञा विद्यामंदिर, गणेश नगर, थेरगाव येथे
वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष
मा. (नितीन भाऊ गवळी) यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर (क्रिटिकल) आजार आढळल्यास त्याच्या पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी किंवा त्यांच्या कार्यकारिणीमार्फत करण्यात येईल, अशी ठाम वचनबद्धता यावेळी जाहीर करण्यात आली.

हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, शहरातील नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि संवेदनशीलता दर्शवणारा उपक्रम ठरला. “वाढदिवस हा दिखाव्यासाठी नाही, तर समाजासाठी” हा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

याच वेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा शहराध्यक्षांच्या वतीने फळ वाटप करून सन्मान करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच शहर संघटक श्री. सुनील जावळे व त्यांची टीम यांनी मोलाची भूमिका बजावली.

सामाजिक न्याय, माणुसकी आणि जबाबदारी या मूल्यांवर आधारित असे उपक्रम राबवून वंचित बहुजन आघाडीने समाजाभिमुख राजकारणाची वेगळी व ठळक छबी पुन्हा एकदा समोर आणली आहे.
