Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

निवडणुकीपूर्वीच भाजप आघाडीवर; शंकर जगतापांचा राजकीय गेमचेंजर.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comDecember 20, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने निर्णायक आघाडी घेतली असून, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विविध पक्षांतील मातब्बर, अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्यांचा जम्बो प्रवेश झाला आहे. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून विरोधी पक्षांच्या गटात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विकासावर विश्वास ठेवत शहराच्या प्रगतीत सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतर नसून शहर विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अजित पवार गटाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, शरद पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक समीर मासुळकर, भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, अमित गावडे, महायुतीचे कार्यकर्ते व माजी अपक्ष नगरसेवक संजय काटे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीनल यादव, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम, तसेच अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आणि विनोद नढे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

या जम्बो प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप संघटना अधिक बळकट झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपासाठी मोठा राजकीय लाभ मानला जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

“शहर विकासाची घोडदौड कायम ठेवणार” – आमदार शंकर जगताप
सर्व नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत करताना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक नगरी, आयटी-सीटी आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरात रोजगाराच्या संधींसोबतच अत्याधुनिक सुविधा नागरिकांना मिळाल्या आहेत. शहराच्या या प्रगतीमागे येथील लोकप्रतिनिधींची विकासाभिमुख भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहरहिताला प्राधान्य देणारी हीच भूमिका आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाने स्वीकारली आहे. त्यांच्या सहकार्याने आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर विकासाची घोडदौड अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू राहील, असा ठाम विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाढदिवस निमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम – प्रज्ञा विद्यामंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर.
Next Article ‘बाहेरचा उमेदवार नको’ वाल्हेकरवाडीतील महिलांची ठाम भूमिका; अजित पवार व नाना काटे यांच्याशी थेट चर्चा
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?