बाटीॅ पुणे समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग तसेच विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान संविधान जागर सप्ताह उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

या अंतर्गत समतादूतांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार–प्रसार करण्यात आला. प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क–कर्तव्ये आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या याबाबत माहिती देत संविधान कायम टिकून राहावे यासाठी नागरिकांची बांधिलकी महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.

सप्ताहात व्याख्यान, प्रबोधनपर कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘हर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत घराघरात जाऊन संविधानाची प्रास्ताविका वाचनासह एक चमचा साखर देऊन तोंड गोड करण्यात आले.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन मा. महासंचालक श्री. सुनील वारे, मा. निबंधक श्री. विशाल लोंढे व मा. विभागप्रमुख श्री. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनातून तसेच प्रकल्प अधिकारी श्रीम. शितल बंडगर यांच्या नियोजनातून झाले.

समतादूत श्री. प्रशांत कुलकर्णी व श्रीम. संगीता शहाडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे संविधान जागर सप्ताह प्रभावीपणे पार पडला.
