|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये शुभम वाल्हेकर यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळताना दिसत आहे. मित्रपरिवार, स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने प्रभागात त्यांच्या प्रचाराचे वातावरण सकारात्मक बनले आहे.

वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बिजलीनगर, गिरिराज, प्रेमलोक पार्क व दळवीनगर या परिसरांमध्ये शुभम वाल्हेकर यांचा जनसंपर्क वाढताना दिसत आहे. घराघरांतून संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेण्यावर भर देण्यात येत असून, तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचाही प्रचाराला सक्रीय सहभाग आहे.

मित्रपरिवाराच्या माध्यमातून राबवण्यात येणारे प्रचार सत्र, बैठका आणि प्रत्यक्ष भेटीमुळे प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सुरक्षितता आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर शुभम वाल्हेकर सातत्याने भूमिका मांडत आहेत

स्थानिक ग्रामस्थांकडूनही त्यांना खंबीर पाठिंबा मिळत असून, विकासाभिमुख आणि संवादात्मक नेतृत्वाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. “समस्या ऐकून घेणारा आणि त्याचा पाठपुरावा करणारा प्रतिनिधी हवा,” अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसून येत आहे.

प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन नियोजनबद्ध विकास साधण्यावर भर देण्याचा निर्धार शुभम वाल्हेकर यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरुण नेतृत्वाला संधी मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये वाढताना दिसत असून, त्याचा लाभ त्यांच्या प्रचाराला होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक १७ मध्ये शुभम वाल्हेकर यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि ग्रामस्थांचा खंबीर पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे.
