Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»काळेवाडीमध्ये देशी कट्ट्यासह युवक अटक – गुन्हे शाखा युनिट 01 ची वेगवान आणि अचूक कारवाई.
गुन्हेगारी

काळेवाडीमध्ये देशी कट्ट्यासह युवक अटक – गुन्हे शाखा युनिट 01 ची वेगवान आणि अचूक कारवाई.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comDecember 12, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||

पिंपरी-चिंचवड : अवैध शस्त्रधारकांवर धडक कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 01 ने काळेवाडी परिसरात एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवून देशी बनावटीचे कट्टा व जिवंत राऊंड बाळगणाऱ्या युवकाला रंगेहाथ पकडले आहे. महापालिका व पोलिस आयुक्तालय हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या शस्त्रप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत मोलाची ठरत आहे.

घटनेनुसार, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलीस हवालदार सागर अवसरे व पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, रोहित महादेव आगरखेड (वय 22, रा. पवनानगर, काळेवाडी) हा इसम अवैधरित्या शस्त्र बाळगून परिसरात फिरत आहे.

मिळालेल्या माहितीस त्वरित प्रतिसाद देत गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी परिसरात सापळा रचला व संशयिताच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. आरोपीस ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे 01 पिस्टल व 01 जिवंत राऊंड असा एकूण ₹50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. संपूर्ण प्रक्रिया पंचासमक्ष आणि नियमांनुसार पंचनाम्याद्वारे पूर्ण करण्यात आली.

अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर प्रकार असल्याने आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या घटकांवर प्रतिबंध बसणार असून, गुन्हे शाखा युनिट 01 च्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सदर ऑपरेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली — सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउपनिरीक्षक कर्मराज गावडे, पो. हवा. जयवंत राऊत, पो. हवा. सागर अवसरे, पो. शि. लक्ष्मीकांत पतंगे, पो. शि. तेजस भालचिम, पो. शि. विजय जानराव या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबाटीॅतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा – नागरिकांमध्ये अधिकार व कर्तव्यांची जागृती.
Next Article वाढदिवस निमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम – प्रज्ञा विद्यामंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?