Author: shauryavartanews2025@gmail.com

छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रिक्षा चालविण्यास देणाऱ्या मालकावरही यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर छावणी भागात रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याच्या गुन्ह्यात रिक्षा मालकाला छावणी पोलिसांनी रविवारी (दि.१५) अटक केली. सय्यद मझरोद्दीन सय्यद अलिमोद्दीन (३०, रा. राहुलनगर, गल्ली क्र ३, रेल्वेस्टेशन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मयत जयराम बबन पिंपळे (२७, रा. वडाळा, श्रीरामपूर, जि. नगर) हा ३ जूनला जेजे हॉस्पिटल येथे आला होता. ४ जूनला त्याची शिक्षण पात्रता परीक्षा असल्याने तो मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाबा पंपाजवळ गेला. तेथून त्याने वाळूज पंढरपूर जाण्यासाठी…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड :  जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 2004 पासून दरवर्षी 14 जून हा दिवस प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते व रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टिनर यांच्या जन्मदिनी “जागतिक रक्तदाता दिन” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि ऐच्छिक रक्तदाता शपथवाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. “रक्त देऊया, आशा जागवूया : एकत्रितपणे जीव वाचवूया!” या संकल्पनेवर आधारित यंदाचा जागतिक रक्तदाता दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात एकूण ५८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वाय.सी.एम. हॉस्पिटलचे…

Read More

केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या…

Read More

पुणे : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि एका गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम (वय 23) याचा सोलापूरजवळील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत ही घटना घडली. या कारवाईने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. लांबोटीत रात्रीच्या सन्नाट्यात चकमक पुणे पोलिसांना काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती की, शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार सोलापूरजवळील लांबोटी गावात आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, ज्यात खून, खंडणी आणि बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे आरोप समाविष्ट आहेत. या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेचे पथक तातडीने लांबोटी येथे रवाना…

Read More

आई-वडील मुलांना उघडं-नागडं पाहतात, पण एका मुलाने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहणे तो प्रसंग व्यक्त करायला शब्द नाहीत. २०१६ मध्ये पप्पांना हृदयविकाराचा झटका आला. बायपास शस्त्रक्रिया सुरु होती. त्या दिवशी मी आठ तास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या सोबत होतो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण होता. त्यांच्या धडधडणाऱ्या काळजावर चाललेली ही लढाई… माझ्यासाठी तो रुग्ण कुणी अनोळखी नव्हता, तो माझा बाप होता. त्या क्षणी एक मुलगा म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून मी तिथे होतो. त्यावेळेला मी बाहेर पडलो असतो तर मम्मी, भाऊ सगळ्यांनी मला प्रश्न केले असते. त्यामुळे पप्पांना या परिस्थितीतून बाहेर काढणे ही माझी जबाबदारी होती. या सगळ्या प्रसंगाने मला…

Read More

पुणे : कात्रजमधील सुखसागर नगर परिसरात यशश्री सोसायटीसमोर आज (शुक्रवारी) दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात श्रेया गौतम येवले (वय २१, रा. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा, पुणे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव टुरिस्ट वॅगन आर कारने (क्र. एमएच १२ यु. एम. ४८४७) फुटपाथवर चालणाऱ्या श्रेयाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळ नगर) मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसला. यावेळी कार नारळाच्या झाडाला धडकून समोर असलेल्या बदामाच्या झाडात अडकली. झाड आणि कारच्या मध्ये सापडून श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मटन मार्केट ते अंबाबाई पटांगण दरम्यानच्या नवीन पुलावर रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नारायण कोंडीबा बुरांडे (रा. तारापूर) हे आपल्या गावाकडे जात असताना गाडीचा कट घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या डिझेल टँकरच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली एक तरुणी देखील जखमी झाली असून तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी पाऊस सुरू होता. मोठ्या पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने शव वाहक वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकले नाही. डिझेल टँकर…

Read More

मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या (Air india) बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून 241 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने (Tata) घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील (ahmedabad plane crash) जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवडे नगर : दगडोबा चौक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज शेखर अण्णा चिंचवडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत त्यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले. शेखर अण्णा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांच्याकडे वैध लायसन्स आहे आणि जे विक्रेते दगडोबा चौक परिसरातच राहतात, त्यांनीच येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करावा. शिवनगरी , बिजलीनगर, वाल्हेकर वाडी या परिसरातील व्यक्तींनी आपल्या-आपल्या भागातच व्यवसाय करावा. त्यांनी सांगितले की, “जर प्रत्येकाने आपल्या भागातच व्यवसाय केला, तर कोणत्याही कुटुंबाला त्रास होणार नाही. उलटपक्षी, प्रत्येक भागात विक्रेत्यांना संधी मिळेल व स्थानिक नागरिकांनाही सहजपणे भाजीपाला उपलब्ध होईल. यामुळे परस्पर हितसंबंध…

Read More

पुणे : गंगाधाम चौकात गतवर्षी ट्रकने दोन महिलांना चिरडले होते. त्यात एका महिलेचा बळी गेला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एका महिलेचा बळी गेला. या चौकातील अशा जीवघेण्या दुर्घटनांना नेमके कोण जबाबदार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी दुर्घटनेनंतर नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून अवजड वाहनांवरील बंदीची अंमलबजावणी करून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले होते. यानंतरही महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? असा जाब नागरिकांनी प्रशासनाला…

Read More