Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
महाराष्ट्र

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 12, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या (Air india) बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून 241 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने (Tata) घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील (ahmedabad plane crash) जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तर, विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.

टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं. ”एअर इंडिया फ्लाइट 171 मधील दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या क्षणाच्या आमच्या दु:खद भावना शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या आहेत. विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबीयांनी आपले प्रियजन गमावले आहेत, आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यासोबत आमच्या सहवेदान आणि प्रार्थना आहेत. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला (वारसांना) टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्चही आणि त्यांना आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन टाटा ग्रुपकडून देण्यात आले आहे. तसेच, विमान दुर्घटनेमुळे इमारत कोसळलेल्या बी.जे. मेडिकलच्या वसतिगृहाची नव्यानी उभारणी करण्यातही टाटा ग्रुप पुढाकार घेईन,” असे टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.

बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार

एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली. दुर्घटनेचे नेमकं कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेस देखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार असल्याची माहिती आहे.

विजय रुपाणींचाही मृत्यू

242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं अन् मोठा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील सर्वच्या सर्व 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. आता, या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनात शिंदे यांनी दिली. ⁠माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमान प्रवासात होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मी दुर्घटनेबाबत ⁠खेद व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदगडोबा चौकातील भाजी विक्रेत्यांना शेखर अण्णा चिंचवडे यांचे मार्गदर्शन — “रहिवाशांनी व्यवसाय करावा , वाहतुकीस अडथळा होऊ देऊ नका”
Next Article पंढरपूर नवीन पुलावर भीषण अपघात : डिझेल टँकरच्या चाकाखाली सापडून युवक जागी ठार, एक मुलगी जखमी
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.
२०१७ मधील पंतनगरमधील खळबळजनक प्रकरणाचा निकाल; ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा कठोर निर्णय

April 18, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?