Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»“रक्त देऊया, आशा जागवूया! – वाय.सी.एम. हॉस्पिटलच्या वतीने जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा”
सामाजिक

“रक्त देऊया, आशा जागवूया! – वाय.सी.एम. हॉस्पिटलच्या वतीने जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा”

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 15, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड :  जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 2004 पासून दरवर्षी 14 जून हा दिवस प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते व रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टिनर यांच्या जन्मदिनी “जागतिक रक्तदाता दिन” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि ऐच्छिक रक्तदाता शपथवाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

“रक्त देऊया, आशा जागवूया : एकत्रितपणे जीव वाचवूया!” या संकल्पनेवर आधारित यंदाचा जागतिक रक्तदाता दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात एकूण ५८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वाय.सी.एम. हॉस्पिटलचे विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे श्री. घोडके, तसेच ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे श्री. सुहास हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऐच्छिक रक्तदाता शपथवाचन वरिष्ठ रक्ततंत्रज्ञ श्री. गिरीजात्मक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

प्रमुख अतिथी डॉ. गोफणे यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे महत्त्व पटवून देत नियमित रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच विविध संस्था, मंडळे, महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहतींनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून वाय.सी.एम. रक्तकेंद्राला सहकार्य करावे असेही आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. किशन गायकवाड (समाजसेवा अधीक्षक, वाय.सी.एम.) यांनी तर आभार प्रदर्शन समुपदेशक श्री. सुनित आवटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, रक्ताचे नाते ट्रस्ट – महाराष्ट्र राज्य, तसेच रक्तकेंद्राचे अधिकारी डॉ. गणेश लांडे, श्रीमती उर्मिला हजारे आणि उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकेदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रैश, ७ जणांचा मृत्यू
Next Article रिक्षा चालकाने प्रवाशाचा केला खून; रिक्षा मालकालाही अटक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?