Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
महाराष्ट्र

रिक्षा चालकाने प्रवाशाचा केला खून; रिक्षा मालकालाही अटक

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रिक्षा चालविण्यास देणाऱ्या मालकावरही यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दिला होता.

त्यानंतर छावणी भागात रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याच्या गुन्ह्यात रिक्षा मालकाला छावणी पोलिसांनी रविवारी (दि.१५) अटक केली. सय्यद मझरोद्दीन सय्यद अलिमोद्दीन (३०, रा. राहुलनगर, गल्ली क्र ३, रेल्वेस्टेशन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी मयत जयराम बबन पिंपळे (२७, रा. वडाळा, श्रीरामपूर, जि. नगर) हा ३ जूनला जेजे हॉस्पिटल येथे आला होता. ४ जूनला त्याची शिक्षण पात्रता परीक्षा असल्याने तो मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाबा पंपाजवळ गेला. तेथून त्याने वाळूज पंढरपूर जाण्यासाठी रिक्षा पकडली.

रिक्षा चालक मुजम्मील कुरेशी रफिक कुरेशी (२१, रा. सादातनगर) याने जयरामला तू तोंडाला मास्क का लावला असे म्हणत वाद घातला. होलिक्रॉस शाळेजवळ त्याला अंधारात घेऊन गेला. शिवीगाळ करून त्याच्या छातीत व पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जयराम जखमी अवस्थेत पळत जेजे हॉस्पिटल येथे गेला. त्यानंतर उपचार सुरु असताना त्याच्या तक्रारीवरून छावणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

त्यानंतर जयराम याचा उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी ७ जूनला आरोपी मुजम्मील कुरेशीला अटक केली होती. दरम्यान, कुरेशीकडे लायसन्स नसताना, तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून, तो सोबत चाकू बाळगतो याची माहिती असताना त्याला रिक्षा चालविण्यास देणारा रिक्षामालक सय्यद मझरोद्दीन याला देखील छावणी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात रविवारी अटक केली.

आरोपीला रिक्षा चालवण्यास देऊन गुन्हा करण्यास अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहित केल्याचा मझरोद्दीनवर ठपका ठेवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी शिलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनात एपीआय विवेक जाधव, उपनिरीक्षक संजय रोडके, जमादार सिद्धार्थ थोरात, रवींद्र देशमुख, कैलास सोरमारे यांनी केली.

आरटीओचे मनुष्यबळाचे रडगाणे

शहरात वाहतुकीचे नियमन करणारे वाहतूक पोलिसच रिक्षाचालकांवर कारवाई करतात. मूळ जबाबदारी असणारे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र शहरात फिरकतही नाहीत. पोलिस आयुक्तांनी आरटीओच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा आरटीओकडून नेहमीप्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे रडगाणे सुरु केले. दुसरीकडे महामार्गावर अडजड वाहनावर अर्थपूर्ण कारवाईसाठी आरटीओ विभाग अग्रेसर असतो हे विशेष.

प्रवाशांसोबत गैरवर्तन झाल्यास रिक्षा मालकही जबाबदार

– प्रवीण पवार, पोलिस आयुक्तरिक्षावर चालक ठेवताना त्याची पूर्व चारित्र्यतापडताळणी करून घ्यावी. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का? परवाना आहे का याची खात्री करूनच त्याला कामावर घ्यावे. कोणत्याही गुन्ह्यात रिक्षाचालक आढळून आल्यास रिक्षा मालकाला देखील आरोपी करण्यात येईल. परवाना एकाचा आणि रिक्षा चालवितो तिसराच असे देखील प्रकार समोर आलेत. विशेषतः दारू पिऊन महिलांची छेड किंवा गैरवर्तन करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“रक्त देऊया, आशा जागवूया! – वाय.सी.एम. हॉस्पिटलच्या वतीने जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा”
Next Article पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.

August 13, 2026

ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.

August 10, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे भव्य रक्तदान शिबिर.

August 7, 2026

पंढरपूरला स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

July 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?