Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत ? सर्व प्रसारमाध्यमांना केली ‘ही’ महत्वाची सूचना
शैक्षणिक

केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत ? सर्व प्रसारमाध्यमांना केली ‘ही’ महत्वाची सूचना

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 26, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील सर्व मीडियासाठी (प्रसारमाध्यमे) एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने, सर्व मिडिया प्लॅटफॉर्म्स, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सनी अत्यंत जबाबदारीने वर्तणूक तसेच सुरक्षा दलांच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये, असे त्यात म्हटले आहे.

केंद्राच्या या ॲडजव्हायजरीनंतर आता पहलगाम हल्ल्यानंतर सरकार नक्कीच काहीतरी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

काय म्हटले आहे ॲडव्हायजरीमध्ये?

● माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे उप संचालक क्षितिज अगरवाल यांनी जारी केलेल्या या ॲडव्हायजरीमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया, हालचालींच्या थेट प्रक्षेपणासंदर्भात सल्ला दिलेला आहे.

● राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्स, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि संरक्षण व अन्य सुरक्षा-संबंधित बाबींवर वृत्तांकन करताना प्रचलित कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

● विशेषतः संरक्षण कारवाया किंवा सुरक्षा दलांच्या हालचालींविषयी थेट प्रक्षेपण, दृश्यफितीचे प्रसारण किंवा “सूत्रांवर आधारित” वृत्तांकन टाळावे.

● संवेदनशील माहिती लवकर जाहीर केल्यास, शत्रू प्रवृत्तींना मदत होऊ शकते आणि त्यामुळे कारवाईची परिणामकारकता व जवानांचे संरक्षण धोक्यात येऊ शकते.

● पूर्वीच्या घटनांमधून जबाबदार वृत्तांकनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कारगिल युद्ध, मुंबईवरील दहशतवादी हल्ला (26/11) आणि कंधार विमान अपहरण या घटनांमध्ये बिनधास्त व निर्बंध नसलेल्या वृत्तांकनामुळे राष्ट्रीय हिताला हानी पोहोचली होती.

मीडिया कव्हरेज मर्यादित असावे

● मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि नागरिक हे राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

● कायदेशीर जबाबदाऱ्यांशिवाय, ही आपली सामूहिक नैतिक जबाबदारी देखील आहे की आपण कोणत्याही ongoing ऑपरेशन किंवा सुरक्षा दलांच्या सुरक्षेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

● माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वीच सर्व टीव्ही चॅनेल्सना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, 2021 मधील नियम 6(1)(प) चे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

● नियम 6(1)(प) नुसार: “कोणताही कार्यक्रम असा प्रसारित होऊ नये ज्यामध्ये सुरक्षा दलांकडून केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण असते.

● अशा प्रसारणावर संबंधित शासनाकडून नियुक्त अधिकाऱ्याद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीपर ब्रिफिंगपुरतेच मीडिया कव्हरेज मर्यादित असावे, जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही.”

संवेदनशीलता आणि जबाबदारीने वृत्तांकन करावे

● अशा प्रकारचे थेट प्रक्षेपण हे केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम 2021 चे उल्लंघन आहे आणि संबंधित नियमांनुसार कारवाईस पात्र ठरू शकते.

● म्हणून, सर्व टीव्ही चॅनेल्सना सूचित करण्यात येते की, सुरक्षा दलांची दहशतवादविरोधी कारवाई व हालचाल यांचे थेट प्रक्षेपण करू नये. केवळ नियुक्त अधिकाऱ्याच्या वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या ब्रिफिंगपर्यंतच मर्यादित कव्हरेज ठेवावे.

● सर्व संबंधित घटकांना विनंती आहे की ते जागरूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीने वृत्तांकन करत राहावं आणि राष्ट्रसेवेमध्ये उच्चतम दर्जाचे मानदंड पाळावेत.

ही सूचना मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर जारी करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारची कृती

● जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. सर्वपक्षीय बैठक, उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथील सभेतून या हल्ल्याला जबाबदार दहशतवाद्यांना शोधून काढून कल्पनेच्या पलीकडली शिक्षा देऊ, अशी घोषणाही केली होती. त्यानंतर आता ही ॲडव्हायजरी आली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधर्म विचारुन पर्यटकांवर गोळीबार करणं हा प्लॅन B , दहशतवाद्यांचा प्लॅन A काय होता ? प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं खळबळ.
Next Article चार किलोमीटरमध्ये तब्बल 31 गतिरोधक ! देहू माळीनगर ते देहूरोड रस्त्यावर प्रवास कसा करायचा?
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?