Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकरवाडी येथे आज दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अंदाजे १,१६४ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या अनधिकृत बांधकामावर मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. यापूर्वीही शहरातील विविध भागांत अनधिकृत बांधकामांवर अनेक कारवाया करण्यात आल्या असल्या, तरी प्रभाग १७ मधील ही आतापर्यंतची पहिली मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

मा. आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आणि मा. अतिरिक्त आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी श्री. राजाराम सरगर यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या कारवाईत बीट निरीक्षक, एमएसएफ जवान, पोलीस कर्मचारी, मनपा मजूर आणि ठेकेदार मजूर यांचा मोठा सहभाग होता. जेसीबी ब्रेकर आणि ट्रॅक्टर ब्रेकरच्या साहाय्याने सदर बांधकाम हटविण्यात आले.

शहरातील इतर प्रभागांमध्येही सध्या अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरू असून, त्याच धर्तीवर आता प्रभाग १७ मध्येही पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात निष्कासन मोहिम राबविण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकच कारवाई करून प्रशासन शांत बसणार नसून, प्रभागातील इतर अनधिकृत बांधकामांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

प्रभाग १७ मध्ये सुरू झालेली ही मोहीम आगामी काळात अधिक वेगाने पुढे नेली जाणार असून, मनपाने संबंधित विभागांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडी आणि परिसरातील अनधिकृत बांधकाम धारकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्पाईन रोडवर धारदार लोखंडी पालघनसह तरुण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ०१ ची शिताफीने कारवाई.
Next Article देहूरोडमध्ये धक्कादायक गोळीबार; रमेश रेड्डी यांची हत्या, परिसरात तणाव.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

एक हात गळ्यात, तरीही कर्तव्य बजावत वाहतूक पोलिसाची वाहतूक कोंडीवर मात.

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?