Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयालगतच्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मैदान उभारणीच्या नावाखाली नदीचे नैसर्गिक अस्तित्वच धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील झाडे तोडण्यासोबतच काही झाडांच्या बुंध्यांवर माती टाकून ती पूर्णपणे गाडली जात आहेत. परिणामी, नदीकाठावरील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच नागरिक मोठ्या प्रमाणात वॉटरपार्ककडे वळत आहेत. मात्र अशाच एका सहलीदरम्यान पुण्यातील एका प्रसिद्ध वॉटरपार्कमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर दुर्घटना घडली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या अपघातात एका महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय ३७, रा. करंदी) या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्यामुळे त्या जोरात खाली आपटल्या. या धक्क्यात त्या बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व बीट मार्शल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या सखोल चौकशीसह तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी चार-चार मजली इमारती बेकायदेशीररित्या उभारण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणातील अनधिकृत…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || चिंचवड : वाल्हेकर वाडी परिसरात तरुणाच्या मृत्यूची गंभीर घटना घडूनही प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात बेकायदा कामांचा वेग वाढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक सांगतात की, आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर स्लॅब टाकणे, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली कामे आणि रस्ते अडवून चालणारे प्रकल्प हे आता नित्याचे झाले आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय ही कामे सर्रास सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. विशेष…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, काही ठिकाणी चार-चार मजली इमारती उघडपणे उभारल्या जात असल्याचे समोर आले आहे. या मोठ्या बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत असताना, लहान घरांवर मात्र प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, मोठे ठेकेदार बिनधास्तपणे अनधिकृत इमारती उभारत असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, स्वतःच्या राहण्यासाठी छोटे बांधकाम करणाऱ्या नागरिकांवर क्षेत्रीय अधिकारी, बीट मार्शल आणि पोलीस बंदोबस्तासह तात्काळ कारवाई होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईतील दुहेरी निकषांवर…

Read More

चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी, शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामस्थळी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तुकाराम शिंदे यांच्या मालकीच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तात्काळ अटक केली असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ही घटना केवळ कामगारांमधील वाद नसून अनधिकृत बांधकामांना मिळणाऱ्या संरक्षणामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे. सदर प्रकरणात बिल्डिंग मालक तुकाराम शिंदे, संबंधित ठेकेदार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर आणि प्रभाग क्र…

Read More

|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे || तळेगाव दाभाडे (पुणे) : येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा मुख्य रोप (लोखंडी दोरी) तुटून झालेल्या भीषण अपघातात 25 ते 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवत तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर 11 कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाची ओळख दिनेश सुरंगे अशी झाली असून, ते कामानिमित्त लिफ्टने खाली जात असताना ही दुर्घटना घडली. सहाव्या आणि सातव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकली होती. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लिफ्टचा मुख्य रोप तुटल्याने लिफ्ट सातव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली. या अपघातात…

Read More

विकास नगर : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे विकास नगर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेटके कॉर्नर, मुकाई मंदिर व श्रीराम चौक परिसरात अनेक झाडे कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर काही दुकानांमध्ये पाणी शिरले आणि काही वाहनेही पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक निलेश तरस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला त्वरित पाचारण केले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली धोकादायक झाडे व फांद्या बाजूला करण्यात आल्या, तसेच पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या जलद आणि तत्पर कार्यवाहीमुळे परिसरातील…

Read More

पिंपरी चिंचवड : युनिट-१ची धडाकेबाज कामगिरी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच छडा लावत गुन्हे शाखा युनिट-१ ने आरोपीस ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रविवार (दि. 29 मार्च 2026) रोजी वाल्हेकरवाडी येथील अर्थव पार्क परिसरात, ममिली मंगल कार्यालयाजवळ श्री. सतीश शिंदे यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी कामगार पुनीत रामनक्षत्र शुक्ला (वय 28) व केशवकुमार मोहन महातो (वय 29) हे दोघे तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले आणि त्यावेळी शुक्ला याने महातो यास धक्का दिल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत महातो याचा जागीच मृत्यू झाला.…

Read More

चिंचवड : चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम साइटवरून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत संबंधित कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी कामगाराने घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मृत कामगाराचा मृतदेह पुढील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Read More