Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

देहूरोडमध्ये धक्कादायक गोळीबार; रमेश रेड्डी यांची हत्या, परिसरात तणाव.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 28, 2026Updated:April 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देहूरोड : मावळ तालुक्यातील देहूरोड परिसरात मंगळवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली असून रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल नऊ राऊंड गोळीबार केला. यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. त्यांना तातडीने देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. काही काळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून नागरिकांची समजूत काढली.

त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हत्येमागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास सुरू आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.
Next Article आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; शिवसेना पदाधिकारी माउली जगताप एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?