Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून अटक.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून फरार झालेल्या आरोपीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अथक पाठलाग करून अखेर अटक केली आहे. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८, ६१(२) आणि ३(५) अंतर्गत ६ वर्षीय मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बसरिन मेहबुब शेख (वय २७, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हिचे फरार आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघे मूळचे अंबाजोगाई येथील शेजारी असून महिला विवाहित आहे. तिला तीन अपत्ये आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वी ती तिच्या ६ वर्षीय मुलगा आवेज शेख याच्यासह कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) येथे प्रियकरासोबत राहण्यासाठी आली होती.

दरम्यान, आवेज हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगनमत करून ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपींनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले तसेच त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून अत्यंत निर्दयीपणे खून केला.

घटनेनंतर गुन्हा लपवण्यासाठी मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मृतदेह इर्टिगा कारमधून धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड येथे नेण्यात आला. मात्र मुलाचे नातेवाईक इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर व पाठीवर मारहाणीच्या जखमा स्पष्ट झाल्यानंतर आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी बसरिन शेख हिची सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वीच तिला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, फरार आरोपी राम कजेवाड याचा तिरुपती (आंध्रप्रदेश) तसेच अंबाजोगाई परिसरात पाठलाग करून पोलिसांनी १७ एप्रिल २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग अव्हाड, श्री बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ श्रीमती श्वेता खेडकर आणि महाळुंगे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अनिल देवडे, तपास पथकाचे सपोनि पुल्ली, सपोफौ चौधरी, तसेच अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हणमंते, प्रशांत कसबे आणि शिवाजी मरकड यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये हे करीत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.
Next Article ३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?