Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
महाराष्ट्र

३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई : पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०१७ मधील अत्यंत गंभीर आणि मन हेलावून टाकणाऱ्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सत्र न्यायालय, मुंबई (कोर्ट क्र. ५४) येथील सत्र न्यायाधीश महेश के. जाधव यांनी सेशन केस क्र. ७९/२०१८ मध्ये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

या प्रकरणातील आरोपी नितीन कारभारी पठारे याने फिर्यादी अफसाना अमजद कुरेशी (वय ३४) व त्यांच्या मुलांना घरातच कैद करून ठेवत सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच किरकोळ कारणांवरून त्यांच्यावर वारंवार मारहाण केली जात होती. दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी फिर्यादीचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा आहील याच्या हातून कप फुटल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात त्याचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

गुन्हा केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चिमुकल्याचा मृतदेह कल्याणजवळील हाजी मलंगगड परिसरात खड्डा खणून पुरला. इतकेच नव्हे तर फिर्यादीची मुलगी तमन्ना हिला धमकावून हा प्रकार लपवण्याचाही प्रयत्न केला.


मात्र आईने दाखवलेल्या धैर्यामुळे हे भीषण सत्य समोर आले. फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी अत्यंत बारकाईने, शिस्तबद्ध आणि पुराव्यांवर आधारित तपास करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले. गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडून न्यायालयासमोर भक्कम मांडणी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ₹२५,००० दंड, कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कठोर कारावास व ₹१०,००० दंड, तसेच कलम ३२३ अंतर्गत १ वर्ष साधी कैद व ₹१,००० दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील रमेश सिरोया यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर मजबूत बाजू मांडली. तसेच तपास प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक अमिता चव्हाण यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या अचूक, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक तपासामुळेच आरोपीला कठोर शिक्षा मिळाली, अशी प्रतिक्रिया न्यायालयीन वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून अटक.
Next Article स्पाईन रोडवर धारदार लोखंडी पालघनसह तरुण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ०१ ची शिताफीने कारवाई.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.

August 13, 2026

ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.

August 10, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे भव्य रक्तदान शिबिर.

August 7, 2026

पंढरपूरला स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

July 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?