Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.

April 17, 2026

हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा वर्षभर फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 01 च्या जाळ्यात

April 17, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा वर्षभर फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 01 च्या जाळ्यात
गुन्हेगारी

हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा वर्षभर फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 01 च्या जाळ्यात

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 01 ने उल्लेखनीय कामगिरी करत वर्षभरापासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोहवा विजय शेळकंदे, पोशि खेडकर आणि पोशि चिखलकर हे पाहिजे, फरार व तडीपार आरोपींचा शोध घेत होते. बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तपास सुरू केला.

दरम्यान, निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाखाली एक इसम हातात धारदार कोयता घेऊन उभा असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित इसम दिसताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत त्याच्या हातातील धारदार लोखंडी कोयता जप्त केला.

तपासादरम्यान आरोपीने आपले नाव सत्यजित उर्फ प्रवीण प्रभाकर रोकडे (वय 25, रा. भीमशक्ती नगर, स्पाईन रोड, मैत्री वस्ती, चिखली, पुणे) असे सांगितले. पुढील चौकशीत तो निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 776/2025 मधील भारतीय न्याय संहिता कलम 311, 115(2), 352 तसेच संबंधित इतर कलमान्वये दाखल गंभीर गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार असलेला पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या धारदार कोयत्याचा पंचनामा करून तो मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अधिनियम कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालासह निगडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट 01 च्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
Next Article चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.

April 17, 2026

धडाकेबाज कारवाई! संत तुकारामनगर पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद; गावठी पिस्टलसह २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

April 13, 2026

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची धडाकेबाज कामगिरी.

March 29, 2026

बांधकाम साइटवरील वादात थरारक घटना; कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून फेकले, जागीच मृत्यू.

March 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात; ६ दुचाकी जप्त, चार गुन्हे उघड.

By shauryavartanews2025@gmail.comApril 17, 20260

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : चिंचवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहनचोरीच्या मालिकेचा…

हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणारा वर्षभर फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट 01 च्या जाळ्यात

April 17, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026

धडाकेबाज कारवाई! संत तुकारामनगर पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद; गावठी पिस्टलसह २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

April 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?