Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

धडाकेबाज कारवाई! संत तुकारामनगर पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद; गावठी पिस्टलसह २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : प्रभु कांगणे ||

पिंपरी-चिंचवड :शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने प्रभावी व धडाकेबाज कारवाई करत ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २ गावठी पिस्टल, २ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण २ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत काही संशयित इसम अवैध शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने तातडीने हालचाली करत एच.ए. ग्राउंड, संत तुकारामनगर येथे सापळा रचला. योग्य वेळी कारवाई करत दीपक भास्कर बर्फे (वय २६, रा. पिंपळे गुरव), अतुल बबन भालेराव (वय ३१, रा. दापोडी) आणि मुकेश राम काची (वय २६, रा. दापोडी) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.


ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची कसून झडती व चौकशी करण्यात आली असता त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच गुन्ह्यात वापरण्याच्या उद्देशाने ठेवलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा उघड होण्यापासून रोखण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपआयुक्त संदिप आटोळे व सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील तसेच पोलीस अंमलदार संतोष रजपुत, जावेद मुजावर, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, दत्तु पाटेकर, अनिल मोहीते, सुनिल धावारे यांनी समन्वय साधत ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांचा पुढाकार ! फसवणुकीला लगाम; भोसरी-चाकणमध्ये ‘विनामूल्य रोजगार केंद्रां’ची सुरुवात.
Next Article पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?