Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे. यामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read More

|| प्रशांत पटाडे || पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर मशीन लावून पत्राशीठ बांधकाम निष्कासणाची कारवाई करत आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोजर लावून तसेच मोठा फौज फाटा लावून महापालिका कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवत कारवाई करत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहे. यात प्रामुख्याने कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. जवळपास २५० एकरवरील १५०० पेक्षा जास्त व्यावसायिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड महापालिकेने जेसीबी आणि बुलडोजर मशीन लावून जमीनदोस्त केली आहेत. हि कारवाई अजून सुरूच राहणार आहे. कायद्याचा धाक…

Read More

|| प्रतिनिधी : अरविंद भोंगळे || वर्धा : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला तिचाच अल्पवयीन मित्र आपल्या घरी घेऊन गेला होता. तिथे त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या चार जणांनी देखील अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 10 फेब्रुवारीला सोमवारी सकाळी पीडितेचा अल्पवयीन मित्र तिला घेऊन आपल्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती…

Read More

|| प्रतिनिधी : किरण आडागळे || देहूरोड : सलग तीन दिवस मुख्य अभियंता महावितरण कार्यालय देहू गैरहजर आणि नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणी नाही. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने वीजपुरवठा संदर्भात अर्ज देण्यासाठी सलग तीन दिवस झाले हेलपाटे मारावे लागत असल्या कारणाने अध्यक्ष्य बापूराव बनसोडे आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता देहू गाव, झोडगे साहेब गैरहजर असल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला त्यांनी जाऊन केला अर्ज. ज्येष्ठ नागरीकांना उन्हा तान्हाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. सततच्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे विद्युत उपकरण खराब होत आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच सर्रास दिवसा ढवळ्या वीजचोरी होत आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास…

Read More

मुंबई : मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची मुलांसमोरच हत्या केली. दोघांनी आधी पतीला दारू पाजली आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जनस्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचे उघड झालं. मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मन्सूरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. पात्र या प्रकरणी आता स्वतः तानाजी सावंत यांनीच समोर येऊन माहिती दिली. आपला मुलगा बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असं काहीही नाही. तर तो त्याच्या मित्रासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजी सावंत म्हणाले, माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तू बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. दरम्यान तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली.…

Read More

|| प्रतिनिधी :  क्षितिजा देव || पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत.अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात याचा प्रत्यय नेहमीच पाहायला मिळतो. आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आर्थिक अडचणीत शिरीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं, ही बाब एकनाथ शिंदेंना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज…

Read More

|| प्रतिनिधी :  किरण आडागळे || दौंड : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात कौटुंबिक वादातून एका महिलेने पहाटे तिच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आणि नंतर पतीवर हल्ला केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या महिलेला तिच्या दोन मुलांची हत्या केल्याबद्दल आणि तिच्या पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याबद्दल अटक केली आहे. पत्नीने केलेल्या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी पहाटे 4.21 च्या सुमारास ही घटना घडली. दौंड तालुक्यामधील शिदेवस्ती (स्वामी चिंचोली) येथे या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल दुर्योधन मिंधे (30) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने तिच्या दोन मुलांची, शंभू…

Read More

|| प्रतिनिधी जुबेर शेख || पिंपरी चिंचवड : गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या अशा १० आरओ प्लांटवर आज महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती आयुक्त शेखरसिंह यांनी दिली. गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी…

Read More

|| प्रतिनिधी अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्स चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. आर.ओ प्लांट अनिश्चित काळासाठी राहणार बंद गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो…

Read More