Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आदेश ! शहरातील अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्यात यावे .
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आदेश ! शहरातील अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्यात यावे .

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 9, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्स चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

आर.ओ प्लांट अनिश्चित काळासाठी राहणार बंद

गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खाजगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनधिकृत खाजगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि आर.ओ प्लांट्सवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

प्रभागनिहाय करण्यात येणार कारवाई

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर आणि सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयाने तसेच आरोग्य वैद्यकीय विभागाकडून परवान्याबाबत तपासणी करूनच या प्लांट्सच्या बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय आर.ओ प्रकल्प (प्लांट) बंद बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिका कटिबद्ध

दूषित भूजलाचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केल्याने गिलियन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आर.ओ प्लॉन्ट्स बहुतेक वेळा परवाना किंवा सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करता पाणी पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो. नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

गिलियन बेरे सिंड्रोमच्या (GBS) पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतल्यानंतरच संबंधित प्लांट्सना परवानगी देण्यात येणार आहे.

– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाची कारवाई ! खुनाच्या गुन्ह्यात १६ वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगाराला गोव्यातून केली अटक.
Next Article पिंपरी चिंचवड शहरातील १० आरओ प्लांट आणि ७ आरओ पाण्याच्या एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?