Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

March 21, 2026

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट.
गुन्हेगारी

पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 10, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

मुंबई : मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची मुलांसमोरच हत्या केली. दोघांनी आधी पतीला दारू पाजली आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला.

आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जनस्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचे उघड झालं.

मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मन्सूरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्याचा फोटोही दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जनस्थळी फेकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडले आहेत.

मृत राजेश हा मालवणी येथे पत्नी पूजा, १० वर्षांची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मन्सूरी मुंबईत आला आणि त्यांच्यासोबत राहू लागला. यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री, पूजा आणि इम्रानने राजेशला मारण्याचे ठरवलं होतं. त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोर चाकूने त्याचा गळा चिरला,

राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरले होते. त्यानंतर आरोपींने ते चादरीने साफ केले. दोघांच्या शरीरावरही रक्ताचे डाग होते, म्हणून त्यांनी कपडे बदलले. घर पुन्हा स्वच्छ केले आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये”; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती
Next Article महावितरण कार्यालयात अर्ज घेण्यासाठी कोणी नसल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला दिला अर्ज.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

काळेवाडीमध्ये देशी कट्ट्यासह युवक अटक – गुन्हे शाखा युनिट 01 ची वेगवान आणि अचूक कारवाई.

December 12, 2025

वाहनतोडफोड प्रकरणी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! वरिष्ठ PI अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हेकर वाडी पोलिसांसह संयुक्त ऑपरेशन सर्व संशयित आरोपी अटकेत.

November 14, 2025

चिंचवडे नगरात वाढत्या वाहनतोडफोडीने खळबळ; तपासासाठी ACP साहेब घटनास्थळी – आरोपींना तातडीने अटक करा, पोलिसांना कडक आदेश.

November 14, 2025

पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून.

November 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

गुन्हे शाखा युनिट-३ ची धडाकेबाज कारवाई; २ लाखांहून अधिक किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMarch 21, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत…

वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.

March 21, 2026

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक; चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त

March 20, 2026

मनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
स्थापत्य विभागातील अधिकार बाह्य संस्थांकडे; वाढीव फीमुळे कोट्यवधींचा भार, कामकाजात विलंबाचा आरोप.

March 18, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?