- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : श्री फत्तेचंद जैन विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा घवघवीत यश मिळवले असून 96.41% सरासरी निकालाची नोंद केली आहे. गुणवत्तेच्या या शर्यतीत आदित्य पवारने 96% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रेयस जाधव 95.80% गुणांसह द्वितीय आणि कृष्णा पवार 94% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिले. या यशामागे संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. आदित्य पवार याचे आई-वडील दोघेही अशिक्षित असून मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवले. शिक्षणाची जाण आणि कष्टांची तयारी या जोरावर आदित्यने हे यश मिळवले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना त्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानले. या यशाबद्दल श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे…
पुणे : बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनीबाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर छापा टाकून गुन्हे दाखल केले. बाणेरमधील बालेवाडी फाटा भागात ‘वेदा स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (२२), तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली, अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. बाणेर भागातील ‘२४ थाई स्पा’…
चाकण : चाकण औद्योगिक भागातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रपाळीत कामावर निघालेल्या २७ वर्षीय महिलेला अंधाराचा फायदा घेत एका नराधमाने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यातून लगतच्या झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि.१४) चाकण लगतच्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथे घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी काही पथकांच्या मदतीने आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान बुधवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास संशयित म्हणून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश सखाराम भागरे (सध्या रा. मेदनकरवाडी चाकण, ता. खेड, मूळ रा. अकोला) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चाकण पोलिस ठाणे हद्दीतील…
|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, गुरसाळे यांच्या वतीने, रामभाऊ गायकवाड (विकास रत्न) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत – बुधवार, 14 मे 2025: सकाळी 10:00 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर सीमारेषेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी 7:00 वाजता “शंभूराजे पाळणा” या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 15 मे 2025: सायंकाळी 7:00 वाजता “गरजा महाराष्ट्र माझा” या जनजागृतीपर कार्यक्रमाचा भरगच्च अनुभव…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड – चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे ११ मे २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणीवर दोन अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केला. १७ वर्षे ९ महिन्यांच्या मुलीवर तिच्या राहत्या घरासमोर अॅक्टीव्हा गाडीतून येऊन गळा, पाठ आणि हातावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ वाय.सी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२५ भा.दं.वि. कलम १०३, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवर आले होते आणि त्यांनी कोमलवर भररस्त्यात वार करत तिचा जागीच खून केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी कृष्णाई कॉलनी परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी त्यावरून तपासाची चक्रे फिरवली आहेत. सध्या अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. कोमल जाधव हिची हत्या नेमकी का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकर वाडी येथील कृष्णाई कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या तपास सुरू आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.
|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा गडचिरोली :- विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या खैरे कुणबी समाजाच्या महाअधिवेशनात ओबीसी नेते, प्रभावी वक्ते आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. हा भव्य सोहळा स्वर्गीय विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न झाला. पुरस्कार स्वीकारताना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे म्हणाले,”हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कुणबी समाज बांधवांचा आहे. समाजाने दाखवलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, आणि हा विश्वास कायम राखण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.” ते पुढे…
|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा || गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला.त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला .त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना काल,शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर,२.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज, छत्रपती संभाजीनगर अशी वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. पार्थ जाधव,गोपाल साखरे,स्वप्निल शिरे,पवन सतकार,सुजित देशमुख,शिवम जायभाये,सार्थक पाठक व जुनेद शेख हे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे मा. उपाध्यक्ष श्री शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी एक समाजहितकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व आ. भा. (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी करून देण्यात येणार असून, यामार्फत गरजूंना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, हा एक सामाजिक बांधिलकीचा आणि लोकसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श आहे. नोंदणी व माहितीचे ठिकाण: शेखर अण्णा चिंचवडे जनसंपर्क कार्यालय, अपर्णा कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवड नगर.…