Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित..

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 11, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा

गडचिरोली :-  विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या खैरे कुणबी समाजाच्या महाअधिवेशनात ओबीसी नेते, प्रभावी वक्ते आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

हा भव्य सोहळा स्वर्गीय विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न झाला.

पुरस्कार स्वीकारताना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे म्हणाले,”हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कुणबी समाज बांधवांचा आहे. समाजाने दाखवलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, आणि हा विश्वास कायम राखण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.”

ते पुढे म्हणाले, “समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर समाजात एकता आणि समभाव राखणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध न करता, सर्व पक्षांना सोबत घेऊन एकत्र वाटचाल केली, तर आपल्या समाजाचा विकास निश्चित साधता येईल. समाजकार्य करताना ज्येष्ठ नागरिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्त्वाचा आदर्श घेऊनच काम करायला हवं. समाजाला नवी दिशा देण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल.”

यानंतर त्यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.”आजच्या या मंचावर उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने समाजाचा अभिमान वाढवला आहे. शिक्षण हेच आपलं खऱ्या अर्थाने भांडवल आहे, आणि या विद्यार्थ्यांनी समाजासाठी आदर्श ठरावं, हीच अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

या सोहळ्याला मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक उद्घाटक भाऊसाहेब थुट्टे राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्त खंजिरी वाधक वर्धा, अशोक शिंदे माजी वस्त्रोद्योग मंत्री म. रा., प्रा.ज्ञानेश्वर वाकुडकर सुप्रसिद्ध कवी, डॉ.विजय देवतळे अध्यक्ष खै.कु.स.चंद्रपूर, ऋषभ राऊत प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शेषराव येलेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, श्याम लेडे, भैय्याजी पोंगडे, विजय वाकुलकर, डॉ. राजेश ठाकरे, बाबाराव उंबरकर, वृंदाताई ठाकरे, देवाजी भुजाडे, हिनाताई देशमुख, एड.दिगंबर गुरपुडे, मोहन डंगारे, एड. स्वप्निल मोंडे, एड. गिरीश बोबाटे, तसेच ज्येष्ठ समाजसेवक व कुणबी समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..
Next Article पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकर वाडीत 18 वर्षीय मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

🥇 ताडीवाला रोडच्या चंद्रिकाचे सुवर्णपंख! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक.

November 7, 2025

केदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रैश, ७ जणांचा मृत्यू

June 15, 2025

‘मला आधी आईचे दागिने द्या,’ मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला,

May 16, 2025

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..

May 11, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?