|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : श्री फत्तेचंद जैन विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा घवघवीत यश मिळवले असून 96.41% सरासरी निकालाची नोंद केली आहे. गुणवत्तेच्या या शर्यतीत आदित्य पवारने 96% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रेयस जाधव 95.80% गुणांसह द्वितीय आणि कृष्णा पवार 94% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिले.

या यशामागे संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. आदित्य पवार याचे आई-वडील दोघेही अशिक्षित असून मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवले. शिक्षणाची जाण आणि कष्टांची तयारी या जोरावर आदित्यने हे यश मिळवले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना त्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानले.

या यशाबद्दल श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अॅड. राजेंद्रकुमारजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी श्री अनिलकुमारजी कांकरिया, प्राचार्य सौ. सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन, पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळिया, श्री संजीव वाखरे, पर्यवेक्षिका सौ. मनीषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी सौ. ज्योती छाजेड, सौ. सुवर्णा गायकवाड, उत्तम बिरजे, सोनल पाटील, कल्पना गोरडे, माधुरी नलवडे आणि प्रभात जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
शाळेने यशाचे नवे शिखर गाठत पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा जपली आहे.
