Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
महाराष्ट्र

ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comAugust 10, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत दाखल होणारे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधी व न्याय विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

अहिल्यानगर (अहमदनगर), परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे प्रत्येकी एक अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयांसाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, सहाय्यक कर्मचारी तसेच इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या निर्णयासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) चे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्यस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे. ॲड. डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शासन निर्णयानुसार, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे चालविण्यासाठी पाच अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांची २,८६३ अतिरिक्त नियमित पदे, सहाय्यभूत कर्मचारीवर्गाची ११,०६४ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ५,८०३ मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या निर्णयासाठी वार्षिक आवर्ती खर्चापोटी ३ कोटी ९९ लाख ३५ हजार ५२० रुपये, तर इतर खर्चासाठी ५१ लाख ६८ हजार ५०० रुपये, असा एकूण ४ कोटी ५१ लाख ४ हजार २० रुपये खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने तसेच २८ जुलै २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे.

२०११ मध्येही झाला होता निर्णय

NDMJ चे राज्य सचिव वैभव गिते यांनी सांगितले की, विधी व न्याय विभागाने १० जून १९९४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयांना विशेष न्यायालय म्हणून विनिर्दिष्ट केले होते. तसेच ८ नोव्हेंबर २००७ रोजी राज्यातील सर्व अतिरिक्त सरकारी वकिलांना विशेष सरकारी वकील म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आले होते.

यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सहा विभागांत अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०११ रोजी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०११ रोजी सहा अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

मात्र, या न्यायालयांकडे ॲट्रॉसिटी कायद्यासोबत भारतीय दंड विधान व इतर कायद्यांखालील खटलेही चालविण्याची जबाबदारी देण्यात आल्याने ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यात अडचणी आल्याचे गिते यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयाची मागणी

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या १३२.८ लाख, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या १०५.१ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ ते २०२३ या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचाराच्या नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत अनुसूचित जाती-जमातींवरील एकूण १६,३५४ गुन्हे नोंदविण्यात आले. अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांची संख्या २०१९ मधील २,१५० वरून २०२३ मध्ये ३,०२४ झाली, तर अनुसूचित जमातींवरील गुन्ह्यांची संख्या ५५९ वरून ७७३ वर पोहोचल्याचे गिते यांनी सांगितले. दोषसिद्धीचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रलंबित खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी अनन्य विशेष न्यायालयांसोबतच शासनाची इच्छाशक्तीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्ह्यात अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई तसेच ऐतिहासिक महाड चवदार तळे येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे गिते यांनी सांगितले.

संघटनेचे स्वागत; मात्र प्रत्येक जिल्ह्यात न्यायालयाची मागणी

“पाच अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्याच्या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कायद्याच्या उद्देशाप्रमाणे या न्यायालयांचे कामकाज झाल्यास प्रलंबित खटले निश्चितच जलदगतीने निकाली निघतील,” अशी प्रतिक्रिया NDMJ चे राज्य महासचिव ॲड. डॉ. केवलजी उके यांनी दिली.

तर “फक्त पाच जिल्ह्यांत अनन्य विशेष न्यायालये स्थापन करून उपयोग नाही. प्रत्येक जिल्ह्यात अशी न्यायालये स्थापन करून दोन महिन्यांच्या आत खटले निकाली काढण्याची व्यवस्था झाली, तरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पीडित कुटुंबांना जलदगतीने न्याय मिळेल,” असे NDMJ चे राज्य सचिव वैभव गिते यांनी सांगितले.

NDMJ च्या राज्य संघटक पंचशीला कुंभारकर यांनीही शासनाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, “ॲट्रॉसिटी कायदा १९८९ मध्ये लागू होऊन ३७ वर्षे झाली आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ पाच जिल्ह्यांत अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत बौद्ध, दलित आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे दिसून येते,” असे मत व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएक हात गळ्यात, तरीही कर्तव्य बजावत वाहतूक पोलिसाची वाहतूक कोंडीवर मात.
Next Article संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.

August 13, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे भव्य रक्तदान शिबिर.

August 7, 2026

पंढरपूरला स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

July 31, 2026

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?