Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह; शिरूर पोलिसांकडून वॉटरपार्क प्रशासनावर गुन्हा दाखल
पुणे

पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह; शिरूर पोलिसांकडून वॉटरपार्क प्रशासनावर गुन्हा दाखल

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 8, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच नागरिक मोठ्या प्रमाणात वॉटरपार्ककडे वळत आहेत. मात्र अशाच एका सहलीदरम्यान पुण्यातील एका प्रसिद्ध वॉटरपार्कमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर दुर्घटना घडली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या अपघातात एका महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अश्विनी संदीप नप्ते (वय ३७, रा. करंदी) या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्यामुळे त्या जोरात खाली आपटल्या. या धक्क्यात त्या बेशुद्ध पडल्या.

घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवावे लागले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे निष्पन्न झाले असून डॉक्टरांनी त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

या गंभीर प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे वॉटरपार्कमध्ये सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होते का, याबाबत प्रशासन आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनधिकृत बांधकामांवर कारवाईचा प्रश्न; प्रभाग १६-१७ मधील अधिकाऱ्यांवर संशयाचे सावट.
Next Article पवना नदीचे पात्र की खेळाचे मैदान? चिंचवडमध्ये नदीपात्रात अतिक्रमण; मैदानाच्या नावाखाली पर्यावरण धोक्यात.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नवले पुलावर चिमुरडीसाठी न्यायाची हाक; रास्तारोकोदरम्यान पोलिस-आंदोलकांमध्ये तणाव, कॉलर पकडल्याचा आरोप.

May 3, 2026

80 हजारांची लाच घेताना लोहगाव पोलीस ठाण्यात PSI रंगेहात पकडला; ACB ची धडाकेबाज कारवाई.

May 2, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026

दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार.

January 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

By shauryavartanews2025@gmail.comJune 12, 20260

|| प्रतिनिधी :  प्रशांत पटाडे || म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू…

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?