Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा प्रश्न; प्रभाग १६-१७ मधील अधिकाऱ्यांवर संशयाचे सावट.
पिंपरी चिंचवड

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा प्रश्न; प्रभाग १६-१७ मधील अधिकाऱ्यांवर संशयाचे सावट.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व बीट मार्शल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या सखोल चौकशीसह तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी चार-चार मजली इमारती बेकायदेशीररित्या उभारण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणातील अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असताना, सामान्य नागरिकांच्या लहान स्वरूपाच्या बांधकामांवर मात्र तात्काळ कारवाई केली जाते. या दुहेरी भूमिकेमुळे संबंधित अधिकारी आणि बीट मार्शल यांच्या कामकाजावर संशय निर्माण झाला आहे.

स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यामुळेच मोठ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेलाही धक्का बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अशा अनधिकृत बांधकामांमुळे भविष्यात अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :

● संबंधित क्षेत्रीय अधिकारी व बीट मार्शल यांची उच्चस्तरीय, निष्पक्ष व सखोल चौकशी करावी.
● चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
● प्रभाग १६ व १७ मधील सर्व अनधिकृत बांधकामांवर तात्काळ तोडफोड कारवाई करावी.
● भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक उत्तरदायित्व निश्चित करावे.

या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article🚨 “वाल्हेकर वाडी हादरली; मृत्यूनंतरही धडाक्यात बेकायदा बांधकामे — आता तरी प्रशासन जागे होणार का?”
Next Article पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

June 12, 2026

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी दारूची ठिकाणे कायमची नष्ट
अवैध हातभट्टी दारू विक्रीची ६ ठिकाणे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत

By shauryavartanews2025@gmail.comJune 12, 20260

|| प्रतिनिधी :  प्रशांत पटाडे || म्हाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू…

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?