Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मराठवाडा»सामाजिक»जय भवानी, जय शिवराय…’ नं सुरुवात करत विकी कौशलनं सादर केली दमदार मराठी कविता! वाचून डोळ्यात येईल पाणी
सामाजिक

जय भवानी, जय शिवराय…’ नं सुरुवात करत विकी कौशलनं सादर केली दमदार मराठी कविता! वाचून डोळ्यात येईल पाणी

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 27, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलचं सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विकी कौशलनं या सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका दमदार पद्धतीनं साकारली आहे. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या विकी कौशलचं मराठी देखील तितकंच उत्तम आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात हे सर्वांना दिसलं. विकी कौशल यांनी यावेळी त्याच्या मनोगताची सुरुवात ‘जय भवानी, जय शिवराय’ नं करत सर्वांची मनं जिंकली.

काय म्हणाला विकी?

विकी कौशल यावेळी बोलताना म्हणाला की, ‘खरं सांगू तर मी खूप नर्व्हस फिल करतोय. मी दहावीपर्यंत मराठी शिकली आहे. मी मराठी बोलू शकतो. दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते. इंग्रजीमध्ये कमी मिळाले होते. पण, ती इतकी चांगली नाही. चूक-भूल माफ.’

जावेद अख्तर यांच्यानंतर इथं येऊन कविता वाचणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर प्रसंग आहे. अमराठी असूनही ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालाय. ज्याचं शिक्षण महाराष्ट्रात झालंय. जो काम महाराष्ट्रात काम करतो. त्याचं आज या शिवाजी पार्काच्या स्टेजवर मराठी भाषा दिनाच्या दिवशी असणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

आशा भोसले म्हणाल्या तौबा-तौबा

मी इथं बसलो होते. त्यावेळी माझ्या जवळ बसलेल्या आशा मॅम (आशा भोसले) यांनी अगदी भीत-भीत मला विचारलं तू देखील कविता वाचणार?. मी म्हणालो हो. मराठीमध्ये? मी म्हणालो हो. आशा मॅम म्हणाल्या तौबा, तौबा..’ मी इथं प्रयत्न करणार आहे, असं सांगत विकीनं कवी कुसामग्रज यांची अजरामर ‘कणा’ कविता सादर केली.

छावा चित्रपट केल्यानंतर मला ‘कणा’ या शब्दाचा अर्थ कळाला, असं विकीनं यावेळी आवर्जुन सांगितलं.

विकी कौशलनं सादर केलेली कविता

कवितेचे नाव – कणा

ओळखलत का सर मला? – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, फक्‍त लढ म्हणा!

-कवी कुसुमाग्रज

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! चार परदेशी महिलांची सुटका.
Next Article अगोदर आमचे स्थलांतर करा नंतर कारवाई करा! स्थानिक रहिवाशांची मागणी घरा वरील अतिक्रमण कारवाई थांबणार का?
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026

श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.

January 31, 2026

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

January 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?