लोहगड : लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला मृत्यू अपघात नसून नियोजित खून असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून समोर आले आहे. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या केतन विशाल अग्रवाल (वय 26, रा. गहुंजे) यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला जोरदार वाऱ्यामुळे तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात केतन यांची भावी पत्नी सिया प्रवीण बसेसर गोयल आणि तिच्या मित्राने मिळून त्यांना दरीत ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यातून हा अपघात नसून खून असल्याचा संशय बळावला. त्यानंतर सिया गोयल हिची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तिच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. अखेर तिने केतन यांना दरीत ढकलून दिल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले

या प्रकरणात सिया गोयल आणि तिच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या खुनामागील नेमके कारण आणि कटाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये होणार होता. विवाहासाठी दोन विमाने बुक करण्यात आली होती, तसेच सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून राजमहालही आरक्षित करण्यात आला होता. केतन यांचे वडील विशाल अग्रवाल हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, अपघाताचे रूप देऊन खून लपविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू
