Author: shauryavartanews2025@gmail.com

सोलापूर :  राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा छळ केल्याचे समोर आले होते. तसेच लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्यूनरही घेतली होती. याप्रकरणानंतर हुंड्यात मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे. अशातच सोलापूरमधील एका फॉर्च्यूनर मालकाने हगवणे प्रकरणानंतर आपल्या गाडीवर लिहलेल्या मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काय आहे प्रकरण ? राज्यात चर्चेत असलेल्या हगवणे प्रकरणात फॉर्च्यूनर गाडीचा मोठा गाजावाजा झाला. हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयान पाहिलं जाते आहे. हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर आहे का? अशीही चर्चा लोक करतात. म्हणूनच करमाळ्याच्या अतुल…

Read More

पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष आणि समाजहिताच्या कार्यात नेहमीच पुढे असलेले लोकनेते शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व ‘आ. भा.’ (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 500 नागरिकांना मोफत कार्ड देण्यात आली. हा उपक्रम केवळ एकदिवसीय उत्सव नसून, गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल…

Read More

|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे || पिंपरी चिंचवड  : रावेत गावाचे खरे शिल्पकार, लोकाभिमुख नगरसेवक, जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे माननीय श्री. मोरेश्वर भोंडवे यांचा आज वाढदिवस! रावेतचा सर्वांगीण विकास, सुशोभीकरण आणि स्वच्छता यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे. रावेतमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरची प्रगती — भव्य सोसायट्या, विस्तीर्ण रस्ते, बीआरटीसारखे अत्याधुनिक बसस्टॉप, हे सगळं त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच शक्य झाले. ‘स्वच्छ रावेत’ ही संकल्पनाही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात आली आणि आज ती एक यशस्वी चळवळ ठरली आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी राजकारणाला सेवा मानले, आणि रावेतमधील प्रत्येक नागरिकाच्या गरजा ओळखून कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात रावेतने एक नवे रूप धारण केले — विकासाच्या…

Read More

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagavane Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला अटक करण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून (Nepal) निलेश चव्हाण याला अटक केली आहे. मध्यरात्री आणणार पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) तीन महाराज अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे. सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य त्यानंतर…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मौजे शिरढोण येथील ग्रामसेविका जाडकर मॅडम यांनी पदाचा दुरुपयोग करून अर्जदाराचे हक्काचे मालकी हक्क असलेली मालमत्ता नियमबाह्य पद्धतीने अर्जदाराच्या आईच्या नावे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित, रहिवासी मारुती दत्तू भुसनर यांनी आज पंचायत समिती पंढरपूर येथे उपोषण सुरु केले आहे. अर्जदार भुसनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट नंबर ३३ मधील ० हे ३९ आर क्षेत्रापैकी १९.५ आर क्षेत्र त्याच्या नावावर असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर आहे. मात्र, सदर घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मालमत्ता क्रमांक २४७ अंतर्गत त्यांच्या आई सौ. यशोदा दत्तू भुसनर यांच्या नावे ग्रामसेविकेने चुकीच्या…

Read More

ठाणे (उल्हासनगर) : ठाण्यातील उल्हासनगरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरनं हे दुष्कृत्य केलं असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडालीये. १५ मे आणि २१ मे रोजी या टीचरनं चिमुकल्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ज्यावेळी आई वडिलांनी मुलाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय…

Read More

पुणे : मागील चार दिवसांपासून पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरु आहे. पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दौंड तालुक्याप्रमाणे पुण्यातील इतर ठिकाणीही पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. विशेषत: भिगवण येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाण्याचे तळे साचले आहे. अंदाजे तीन किलोमीटरपर्यंतचा सर्विस रोड पाण्याखाली गेला आहे. मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे.…

Read More

बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांचे पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दाब वाढला यामुळे लिमटेकजवळील नीरा डावा कालव्यात भगदाड पडले आहे. पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यातील वहनक्षमता अचानक वाढल्याने ही घटना घडली. मान्सूनपूर्व पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास अडचणी निर्माण झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…

Read More

मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांवर पावसाचं सावट पाहायला मिळालं. तर, काही भागांमध्ये मंगळवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी पावसानं मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपलं. दरम्यान पावसाचं हे सावट अद्याप निवळलं नसून, हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागाला ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये नारिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना करण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा…

Read More