Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पुणे

पुण्यातील ज्वेलर्समधून कर्मचारी हळूहळू वस्तू लंपास करत राहिला, कधी अंगठी, कधी कॉईन… साडेचार कोटींची चोरी

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पुणे :  सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला घातला तब्बल 4 कोटी 58 लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा हा प्रताप आहे.

विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला अटक केली आहे. दोन महिन्यात सेल्समनने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 रुपयांचे सोने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे सराफी पेढी मधील अंगठी, कॉइन व वेडणी या काउंटरची जबाबदारी होती. दररोज, तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेऊन तिथेच ठेवत होता. विक्री झालेल्या वस्तू व शिल्लक वस्तू यांची नोंद ठेवताना तो चोरुन नेलेल्या वस्तूंचा शिल्लक वस्तूमध्ये दाखवत होता यामुळे दुकानात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र, 26 मे रोजी स्टॉक तपासणी करताना नितीन डांगे यांना संशय आला. त्यांनी सर्व स्टॉक मोजून पाहिला तर त्यात तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 किमतीच्या वस्तू गायब असल्याचे समोर आलं. पोलिसांनी आता प्रतीक नगरकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

नेमकं काय घडलं ?

शहरातील नारायण पेठ परिसरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या सराफ पेढीत तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी पेढीतच सेल्समन म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक नगरकर (वय 35, रा. सुतारदरा, कोथरूड) याने केल्याचे तपासात उघड झाले असून, त्याच्याविरुद्ध अपहार आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेढीचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (वय 37, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा पत्र्या मारुती चौकाजवळील नीलकंठ ज्वेलर्समध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. त्याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी अशा विविध मौल्यवान दागिन्यांच्या विक्रीचे आणि साठवणीचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, 1 एप्रिल ते 26 मे 2025 या कालावधीत त्याने गुपचूपपणे एकामागोमाग एक अशा प्रकारे साडेचार कोटी रुपयांचे दागिन्यांचे अपहार केले. ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभावाच्या घरी जायला निघाली, वाटेत बसची जोरदार धडक, मामाचा मृत्यू, माय-लेक जखमी, रायगडमध्ये भीषण अपघात
Next Article माजी नगरसेवक विश्वास गजरमल आणि त्यांच्या टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईची मागणी
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

सागर मारणे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळशीतील शाळेलगतच्या MBBM कंपनीच्या प्रदूषणाची MPCBकडून चौकशी.

August 8, 2026

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात; वाकडच्या युवा उद्योजकाचा मृत्यू.

August 7, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?