|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी चिंचवड : अजंठा नगर येथील रहिवासी यास्मीन जमील पठाण यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर करत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिनांक ०१ जून २०२५ रोजी रात्री यास्मीन पठाण यांचे पती जमील अब्दुल पठाण यांच्यावर माझी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींमध्ये विजय धेंडे, राहुल साळुंखे, भैय्या उर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, अज्जू महाकाली, अशीफ शेख व अन्य पाच-सहा गुंडांचा समावेश असल्याचा आरोप यास्मीन पठाण यांनी केला आहे.
पीडितांचे म्हणणे आहे की, मारहाणीनंतर पीडितांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विजय धेंडेमार्फत धमक्या देण्यात आल्या की, “तुझ्या नवऱ्याला संपवले, आता तुला आणि तुझ्या कुटुंबालाही संपवू.”

तक्रारीत म्हटले आहे की, मा.नगरसेवक विश्वास गजरमल यांनी आर. के. बिल्डर्सच्या SRA प्रकल्पात अनधिकृत ऑफिस थाटले असून, तेथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना एकत्र करून दारू पार्टी व बेकायदेशीर कारवाया केल्या जातात. यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
विश्वास गजरमल, विजय धेंडे, राहुल साळुंखे, बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड यांच्यावर खंडणी, फसवणूक, प्राणघातक हल्ले, शस्त्रसाठा आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, यांची माहिती FIR प्रत आणि पोलिस रेकॉर्डमध्ये स्पष्ट आहे.

आरोपींवर दाखल गुन्हे:
विश्वास गजरमल – फसवणूक, बँकिंग गुन्हे (सेन्ट्रल बँक, HDFC), खंडणी.
विजय धेंडे – अपहरण व इतर गुन्हे.
राहुल साळुंखे – आर्थिक फसवणूक.
भैय्या उर्फ बाबासाहेब गजरमल – अनेक गंभीर IPC आणि Arms Act अंतर्गत गुन्हे.
इतर आरोपी देखील सराईत गुन्हेगार.
यास्मीन पठाण यांनी पोलिस आयुक्तांकडे विनंती केली आहे की, विश्वास गजरमल यांच्याविरोधात MCOCA अंतर्गत कारवाई करून त्यांचा गुन्हेगारीचा अड्डा नष्ट करण्यात यावा, तसेच पीडित व त्यांच्या कुटुंबाला संरक्षण आणि न्याय मिळावा.
