|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी-चिंचवड : अवघ्या दीड वर्षांची निरागस चिमुरडी गॅलरीतून पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना 31 मे 2025 रोजी किवळे येथील पटेल रेसिडेन्सी येथे घडली. मृत मुलीचे नाव निरवी जगदीश नाकरानी असून ती आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती.

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, फ्लॅट पाहत असताना आठव्या मजल्यावरील गॅलरीतून निरवीचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी सूर्या हॉस्पिटल, वाकड येथे नेण्यात आले. मात्र दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

निरवीचे वडील जगदीश नाकरानी हे सप्तर्षी सोसायटी, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे राहत असून मुलगी आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी किवळे येथे गेली होती.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रावेत पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
