- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार भूमकर हे फॉर्च्युनर कारमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास बोगद्यात त्यांच्या कारने पुढे असलेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोगद्यातील दोन लेनवर काही वाहने उभी असल्याने वाहतुकीच्या परिस्थितीमुळे वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार…
चिंचवड, दि. २८ जुलै : श्री गुरु गणेश बालक मंदिर, चिंचवड तसेच सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे गुरुपौर्णिमा आणि जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण पर्वाच्या प्रारंभानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व संस्कारमूल्य जोपासणाऱ्या उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी महर्षी वेदव्यास, त्यांचे शिष्य तसेच भगवान महावीर यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आकर्षक सादरीकरणातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा, गुरूंचे जीवनातील स्थान तसेच जैन धर्मातील चातुर्मास आणि पर्युषण पर्वाचे आध्यात्मिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मातृपूजन कार्यक्रमाने उपस्थितांना भावूक केले. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पूजन करून…
प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूर : पंढरपूर येथे स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पद निर्माण करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पंढरपूरच्या वाढत्या लोकसंख्येसह धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयाची आवश्यकता असल्याचे आमदार पाटील यांनी शासनाकडे पत्राद्वारे तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडले होते. त्यानंतर त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीदरम्यान लाखो वारकरी दाखल होतात. याशिवाय वर्षभर धार्मिक कार्यक्रम, विविध व्हीआयपी दौरे, परदेशी पर्यटकांची ये-जा आणि वाढती लोकसंख्या यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर…
पिंपरी, दि. ३० : चिखली पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन सराईत आरोपींना अटक करून पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अन्य चार गंभीर गुन्ह्यांमध्येही पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिखली पोलिसांनी राज संतोष बापर्डेकर (वय २३, रा. शिवपार्वती हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या पाच…
चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर, चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्राचार्य मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. सोहळ्यात विद्यार्थ्यांनी…
पिंपरी-चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी मानद सचिव तसेच पिंपरी-चिंचवडचे पहिले स्काऊट कमिशनर स्व. श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या स्काऊट पथकाने स्व. मुथा यांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवकार महामंत्र व ‘ॐ नमः शिवाय’ जप करण्यात आला. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया, कार्यकारिणी सदस्य प्रकाशचंद बंब व जयकुमार धोका यांच्या हस्ते विविध स्पर्धा दालनांचे उद्घाटन करण्यात आले.…
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या अत्यंत संवेदनशील आणि राज्यभर संतापाची लाट उसळविणाऱ्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (दि. २५ जून) जाहीर होणार आहे. अवघ्या पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत तपास, आरोपपत्र दाखल करणे आणि न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्याने हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक मानला जात आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र दिनी…
लोणावळा, दि. 23 जून : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अगरवाल (वय 25, रा. गहुंजे, ता. मावळ) याचा मृतदेह 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये आढळून आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सिया प्रविण गोयल (वय 20, रा. मार्केट यार्ड, पुणे) हिने किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस…
लोहगड : लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला मृत्यू अपघात नसून नियोजित खून असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून समोर आले आहे. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या केतन विशाल अग्रवाल (वय 26, रा. गहुंजे) यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला जोरदार वाऱ्यामुळे तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात केतन यांची भावी पत्नी सिया प्रवीण बसेसर गोयल आणि तिच्या मित्राने मिळून त्यांना दरीत ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यातून हा अपघात नसून खून असल्याचा संशय बळावला. त्यानंतर सिया गोयल…
पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील साने चौक येथे शनिवारी (दि. 21) सायंकाळी कोयता गँगने पुन्हा दहशत माजवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक ऊर्फ बाबू ननावरे (वय 24, रा. सुदर्शन नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सिद्धार्थ धाईजे (वय 21), शिवशंकर श्रीमंगल (वय 20) व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंह ऑटो गॅरेज व जय अंबे इलेक्ट्रिकल्सजवळ झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने सपासप वार केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतिक कसाळकर यालाही मारहाण करण्यात आली.…