- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील सर्व मीडियासाठी (प्रसारमाध्यमे) एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने, सर्व मिडिया प्लॅटफॉर्म्स, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सनी अत्यंत जबाबदारीने वर्तणूक तसेच सुरक्षा दलांच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये, असे त्यात म्हटले आहे. केंद्राच्या या ॲडजव्हायजरीनंतर आता पहलगाम हल्ल्यानंतर सरकार नक्कीच काहीतरी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. काय म्हटले आहे ॲडव्हायजरीमध्ये? ● माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे उप संचालक क्षितिज अगरवाल यांनी जारी केलेल्या या ॲडव्हायजरीमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया, हालचालींच्या थेट प्रक्षेपणासंदर्भात सल्ला दिलेला आहे. ● राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्स, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा…
पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात आलीय. सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. त्याच दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने एक नवा दावा केलाय. पर्यटकांवर गोळ्या झाडणं हा दहशतवाद्यांचा प्लॅन बी होता, त्यांचा प्लॅन ए हा फेल झाला होता,. इतकेच नाही तर सुरक्षा यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या रेखाचित्रातील एका दहशतवाद्याला त्यांनी हल्ल्याच्या दोनदिवसाआधीच पाहिलं होतं, असा दावा एका महिलेने केलाय. महिलेच्या या दाव्याने मोठी खळबळ उडालीय. महिला पर्यटकाच्या म्हणण्यानुसार,त्यांना ज्या व्यक्तीने खेचरवरून फिरवलं होतं. त्याचं बोलणं महिलेनं ऐकलं होतं. तो कोणाशीतरी कोड भाषेत बोलत होता. इतकेच नाही तर त्याने महिला पर्यटकासोबत गप्पा केला होत्या. दोघांमधील…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 पासून सुरू असलेला सिंधू जल करार तात्काळ स्थगित करण्यात आल्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या या निर्णायक कृतीने पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या पाण्याच्या स्त्रोतांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तेथील सरकार अडचणीत येऊ शकते. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारचा जलप्रहार मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 2 विदेशी पर्यटकांचा समावेश होता. 17 जण गंभीर जखमी झाले. पुलवामानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेने ‘द रेसिस्टन्स फ्रंट…
देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा. काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश. सर्व सुविधा असताना, कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणे हे तुलनेने अधिक सोपं. पण संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश (UPSC Result) मिळवणे म्हणजे अधिक कौतुकास्पद. हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवलंय. बिरदेव सिद्धापा डोणे (Birdev Done ) असं त्याचं नाव आहे. यूपीएससीमध्ये त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. बिरदेव…
|| प्रतिनिधी : अरविंद भोंगाळे || पुणे : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९० हून अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या कुटूंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केली. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची, तात्पुरत्या निवाऱ्याची, अन्न-पाण्याच्या पुरवठ्याची, तसेच दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झोपडपट्टी भागातील वीज व गॅससारख्या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा…
पुणे : जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घण खुन करुन पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून २४ तासांच्या आत जेरबंद केले अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष वावरे (वय २६, रा. संतोषनगर,कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५, रा. खोपडेनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा़ कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास संतोषनगरमध्ये घडली होती.…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 12 ऑक्टोबर 2024 ला बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दिकी यांना धमकी आल्यानं, सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांच्याकडून…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. हत्या, दरोडा, बलात्कार अशा प्रकारच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. याचदरम्यान, पुण्यातील बिबडेवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबडेवाडीतील एका शेतकऱ्याची काही पैशांसाठी हत्या करण्यात आली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना उघडकीस आली आहे. पैशांसाठी बिबवेवाडीतील शेतकऱ्याचा धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण ऊर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सतीश विठ्ठल खडके (वय ३५,…
|| प्रतिनिधी : राजेश वाईकर || मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या सर्विस रोडवर धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीतून हात लटकत रील शूट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. धावत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने सोमवारी नवी मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खातं खडबडून जागं झालं आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचलं आहे. सदर प्रकरणात आता कारवाईही करण्यात आली आहे. व्हिडीओ शूट करुन पोलिसांकडे तक्रार धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीमधून कोपरापर्यंतचा हात बाहेर लटकत असलेल्या अवस्थेत एक इनोव्हा सोमवारी नवी मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होती. हे दृष्य पाहणाऱ्या…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. जामखेडमधून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. मोर्शीतील निर्जनस्थळी जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांच्या आत्महत्याचे कारण काय? याबाबत पोलिसांनी तपास सुरु केलाय. जामखेडच्या दोन मित्रांची पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्या 1) तुषार अशोक ढगे वय 25 वर्ष 2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय 30 वर्ष (राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मयत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सणसवाडी तालुका शिरूर यांनी…