Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » UPSC चा निकाल लागला, IPS झालेला कोल्हापूरचा बिरदेव मात्र मेंढ्या घेऊन कर्नाटकला गेला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार
शैक्षणिक

UPSC चा निकाल लागला, IPS झालेला कोल्हापूरचा बिरदेव मात्र मेंढ्या घेऊन कर्नाटकला गेला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा. काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश.

सर्व सुविधा असताना, कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणे हे तुलनेने अधिक सोपं. पण संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश (UPSC Result) मिळवणे म्हणजे अधिक कौतुकास्पद. हेच यश कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मिळवलंय. बिरदेव सिद्धापा डोणे (Birdev Done ) असं त्याचं नाव आहे. यूपीएससीमध्ये त्याने देशात 551 वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता.

बिरदेव डोणेचे ( IPS) मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे. शाळेत असल्यापासूनच आयपीएस व्हायची इच्छा, त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551 व्या क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे.

दहावी-बारावीमध्ये पहिला क्रमांक

बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदीर शाळेत झाले. त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये 96 टक्के गुण घेऊन बिरदेव हा मुरगूड केंद्रात पहिला आला. त्यानंतर मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. बारावीमध्येही 89 टक्के गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर पुण्यातील सीओईपीमधून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

IPS व्हायचं स्वप्न उराशी

सुरुवातीपासूनच यूपीएससी करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवने उराशी बाळगलं. पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती. दिल्ली-पुण्यात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचे. त्यासाठी महिनाकाठी किमान दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च. तो खर्च परवडणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला. परंतु आयपीएस व्हायचंच या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली.

बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे. त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला. बिरदेवने दोन वर्षे दिल्लीत अभ्यास केला. त्यानंतर पुण्यात येऊन तयारी केली. पहिल्या दोन संधीमध्ये तो अपयशी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात तो देशात 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

निकाल लागला त्यावेळी मेंढ्या घेऊन कर्नाटकात

यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आली. त्यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव मात्र गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आई-वडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यासंह गेला होता. निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला.

जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच कोल्हापूरच्या बिरदेव डोणेने त्याच्या कृतीतून सिद्ध केलं.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचंदननगर आगीत ९० हून अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त; रहिवाशांचे पुनर्वसन करा,गोऱ्हे यांची मागणी
Next Article भारताचा जलप्रहार अन् पाकिस्तान बिथरला ! मास्टरमाइंड सैफुल्लाहची गयावया, म्हणतो “तो मी नव्हेच”
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

अनुसूचित समाजातील विवाहितेवरील अत्याचार प्रकरण तापले; आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

May 26, 2026

प्रभाग १७ मध्ये अनधिकृत बांधकामांवर मनपाचा बुलडोझर; वाल्हेकरवाडीत पहिली मोठी कारवाई, पुढील मोहिमेची तयारी.

April 23, 2026

नितीन गवळी यांची मागणी : वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कामगाराचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह मालक-ठेकेदारांना सह-आरोपी करा.

April 1, 2026

रावेत बंधारा प्रदूषण प्रकरण; सागर एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशा

February 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?