- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
इंदापूर : इंदापूर शहरातील डॉ. भाग्यश्री चव्हाण हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर यश मिळवत शहरातील पहिली महिला एम. एस. सर्जन होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. भाग्यश्रीने नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील एम. एस. सी. पदवी मिळवली. ती शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर या केंद्राचे प्रमुख व सेवानिवृत्त शिक्षक महादेव चव्हाण व शिक्षिका वैशाली चव्हाण यांची कन्या आहे. भाग्यश्रीने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ मध्ये पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पाचवी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथील एच.…
|| प्रतिनिधी क्षितिजा देव || पुणे : रोज घरी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी येणार्याने घरात कोणी नाही हे पाहून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या पाव विक्रेत्याला अटक केली आहे. समसाद खॉ (रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) असे या पाव विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत एका ४५ वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता फिर्यादीच्या घरी झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समसाद खॉ हा नेहमी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतो. २ मे रोजी फिर्यादी…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कलरीपायट्टू स्पर्धेत पिंपरी चिंचवड कलरीपायट्टू असोसिएशनच्या खेळाडूंनी भव्य कामगिरी करत एकूण 11 पदके पटकावली. विशेष म्हणजे या यशामुळे सर्व 11 खेळाडूंची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कलरीपायट्टू स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंमध्ये खालीलप्रमाणे कामगिरी झाली: 1. वर्तिका पाटील – 1 सुवर्ण, 1 कांस्य 2. श्रेया दंडे – 1 रौप्य 3. प्रिया सैनी – 1 कांस्य 4. निक्षिता पाटील – 2 कांस्य 5. तनिष्का ठोंबरे – 1 कांस्य 6. स्नेहल मर्दाने – 1 सुवर्ण, 1 कांस्य 7. वैदेही नवले – 1 रौप्य 8. ओमराजे जाधव…
|| प्रतिनिधी – अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी यमुनानगर, निगडी येथील मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात खुल्या राज्यस्तरीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील सात जिल्ह्यांमधून २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ५० खेळाडूंनी विविध प्रकारात आपले कौशल्य दाखवत पदके जिंकली. लाठी लढत, लाठी फिरविणे, सुराला फिरविणे, तलवार चालवणे, भाला फिरविणे अशा पारंपरिक प्रकारांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावत अजिंक्यपद मिळवले. द्वितीय क्रमांक जालना जिल्ह्याने तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्याने मिळवला.…
ठाणे : जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलींसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील फेणे गावच्या हद्दीत घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेतल्याचे समोर आले आहे. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. अधिक माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (व-३२) व मुली नंदिनी (व-१२),नेहा (वय -७) व अनु (वय -४) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो घरी…
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका चिमुकलीने ३ वर्षे, ४ महिने आणि १ दिवसाच्या वयात संथारा केला आहे. असं करणारी ती पहिली मुलगी आहे जिने इतक्या लहान वयात संथारा घेतला आहे. संथारा घेतल्यानंतर १० मिनिटांनी चिमुकलीने आपला जीव दिला. 3 वर्षांच्या वियानाला अभिग्रहधारी राजेश मुनींनी संथारा दिला होता. वियानाला ब्रेन ट्यूमर होता. जानेवारी महिन्यात, कुटुंबाने तिच्यावर मुंबईत व्हिएन्नाचे ऑपरेशन केले. शस्त्रक्रियेनंतर व्हिएन्नाची प्रकृती काही दिवस ठीक राहिली. पण मार्चमध्ये जेव्हा त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली तेव्हा कुटुंबीय त्यांना राजेश मुनी यांच्याकडे घेऊन गेले. राजेश मुनी यांनी वियानाच्या कुटुंबाला सल्ला दिला की वियानाला संथारा द्यावा. वियानाची अवस्था पाहून राजेश मुनी म्हणाले होते…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पुणे : पहाटेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने नवले पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवरील पडली. ही कार नेमकी सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या दुचाकीवर पडली. त्यात दुचाकीवरील सहप्रवासी याचा मृत्यु झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे मर्सिडीज कारमधील एअरबॅगमुळे चालक व इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) असे मृत्यु पावलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. प्रज्योत दीपक पुजारी (वय २१, रा. चिंचवड) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी मर्सिडीज चालकासह त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मर्सिडीज चालक शुभम भोसले (रा. पिपंरी चिंचवड) हा…
नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. यातच पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी एका तरुणावर प्राणघात हल्ला करण्यात आला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांत तीन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच १ मे रोजी पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. यात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रितेश डोईफोडे असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून रितेश डोईफोडे याच्यासह…
बीड : बीडमधील परळी खूनाच्या घटनेने पुन्हा हादरली आहे. दारूसाठी पैसे देत नसल्यामुळे पुतण्याने चुलतीचा जीव घेतलाय. पुतण्याने रागाच्या भरात घरातील कुऱ्हाडीने चुलतीचा जीव घेतला. डोक्यावर आणि अंगावर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्याने चुलतीची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावर पळ काढला. कावळ्याची वाडी येथे ही घटना घडली आहे. परिमाला बाबुराव कावळे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव चंद्रकांत कावळे असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे २५ वर्षीय पुतण्याने ६५ वर्षीय चुलतीचा जीव घेतला. पुतण्याने चुलतीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. आरोपी दारूडा पुतण्या चंद्रकांत धुराजी कावळे (वय…
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला. कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली होती. अपघात घडल्याचे समजतात पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले .जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली . गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडलाय. कांदा काढणीसाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता . मात्र धामणगाव…