Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
महाराष्ट्र

कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटला, 3 महिला ठार 15 जखमी

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 1, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला. कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली होती.

अपघात घडल्याचे समजतात पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले .जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली . गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडलाय.

कांदा काढणीसाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात

बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता . मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला .या पिकअप मध्ये साधारण 18-20 महिला होत्या .टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले .वाहन रस्त्याच्या कडेला उलटले .या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला .तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत .अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली .त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते .जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय .कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते .पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे . कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचे समोरील टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जातात.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा !”
Next Article परळी हादरली, पुतण्याने चुलतीचा घेतला जीव, कुऱ्हाडीने डोक्यावर अन् अंगावर सपासप वार
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.

August 13, 2026

ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.

August 10, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे भव्य रक्तदान शिबिर.

August 7, 2026

पंढरपूरला स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

July 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?